‘ही ‘ विदेशी कंपनी करणार एक हजार अभियंत्यांची भरती; मिळणार मोठे पॅकेज

इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग  (Samsung) पुढील वर्षी भारतातील तब्बल 1 हजार इंजिनियरची भरती करणार आहे. हे सर्व इंजिनिअर आयआयटी आणि इतर प्रमुख इंजनियरिंग संस्थांमधून नियुक्त करण्यात येणार आहेत.

'ही ' विदेशी कंपनी करणार एक हजार अभियंत्यांची भरती; मिळणार मोठे पॅकेज
प्रातिनिधिक फोटो


नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग  (Samsung) पुढील वर्षी भारतातील तब्बल 1 हजार इंजिनियरची भरती करणार आहे. हे सर्व इंजिनिअर आयआयटी आणि इतर प्रमुख इंजनियरिंग संस्थांमधून नियुक्त करण्यात येणार आहेत. बुधवारी कंपनीच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुढील वर्षी कंपनीमध्ये एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येणार असून, त्यामध्ये इलेक्टॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉप्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

तरुणांना मिळणार संधी

याबाबत बोलताना सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष समीर वधावन यांनी म्हटले आहे की, तरुणांना अधिकाधिक संधी देऊन, त्यांच्या कल्पनांचा कंपनीसाठी उपयोग करण्याचे उद्दिष्ट सॅमसंगने ठेवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची भरती होणार आहे. याच पार्श्वभूमीवर  कंपनीकडून पुढील वर्षी एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येईल. या अभियंत्यांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, डाटा मॅनेजमेंट आणि स्वफ्टवेअर क्षेत्रातील अभियंत्याचा समावेश असणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले वेतने देखील देण्यात येईल.

आणखी मनुष्यबळाची गरज

पुढे बोलताना ते म्हणाले की, कंपनी भारतातील उत्पादन वाढवण्याच्या विचारात आहे. यासाठी आम्हाला मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ हजार अभियंत्यांनाच नव्हे तर आणखी काही अभियंंत्यांना देखील संधी दिली जाऊ शकते.  हे सर्व अभियंते आयआयटी कानपूर, दिल्ली अशा नामांकित संस्थांमधून भरण्यात येतील.

संबंधित बातम्या

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत

ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूलमध्ये, मेघालयात TMC प्रमुख विरोधी पक्ष

Election 2022: भाजप 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान राबवणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI