सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय.

सावधान, कोरोना काळात 'हा' एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा
State Bank of India
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:59 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. सध्या अनेक SBI ग्राहकांना तुमचं खातं बंद पडलं आहे आणि ते पुन्हा सुरु करण्यासाठी केवायसी (KYC-Know Your Customer) पूर्ण करण्यास सांगितलं जात आहे. त्यासाठी संबंधित मेसेजमध्ये एक लिंक देऊन तेथे ग्राहकांना व्यक्तिगत माहिती भरण्यास सांगितलं जातंय. मात्र, येथे ग्राहकांच्या फसवणुकीला सुरुवात होत असल्याचं उघड झालंय. अनेक ग्राहक भोळेपणातून किंवा अज्ञानातून या लिंकवर आपली माहिती भरत आहेत. त्यानंतर लगेचच सायबर गुन्हेगार संबंधितांच्या खात्यातून पैसे लंपास करत आहेत. म्हणूनच तुम्हालाही असे मेसेज आले असतील तर सावध व्हा (SBI alert customers about fraud on the name of KYC Know Your Customer message).

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना या फसवणुकीपासून सावध करण्यासाठी या फसव्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या मेसेजमध्ये ग्राहकांना इंग्रजीत तुमचं एसबीआय बँक खातं बंद झाल्याचं सांगितलं जातं. तसेच तुमची माहिती अद्ययावत करा, असं सांगत एक फसवी लिंक दिली जाते. काही लोक ही लिंक पाहून सावध होतात, मात्र असे शेकडो लोक आहेत ज्यांची दररोज फसवणूक होते. फसवणुकीनंतर अनेक लोक तक्रार करतात मात्र त्यावेळी उशीर झालेला असतो. म्हणूनच असं काही होण्याआधीच या प्रकारांपासून सावध राहणं महत्त्वाचं आहे.

तुम्हालाही असा मेसेज आलाय? मग सावध व्हा

जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. अशा कोणत्याही मेसेजमधील लिंकवर क्लिक करु नका अथवा त्यात माहिती भरु नका. जर असं केलं तर क्षणात तुमच्या बँक खात्यातील तुमची आयुष्यभराची कमाई गायब होऊ शकते. आपल्या जवळच्या लोकांनाही या फसवणुकीबद्दल जागृक करा, असंही आवाहन जाणकार करतात.

ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्यासोबतच ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर SBI ने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फ्रॉड होण्यापासून वाचवण्यासाठी सतर्क केले आहे. SBI ने केलेल्या ट्वीटनुसार, सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती ही त्यांच्याकडे ठेवा. इतर कोणालाही ही माहिती देताना विचार करा. यामुळे तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहतील, अशी माहिती SBI ने दिली आहे.

खासगी माहिती सार्वजनिक करु नका

एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, Mr. Thinkeshwar हे त्यांची खासगी माहिती नेहमी गुप्त ठेवतात. कोणतीही खासगी माहिती इतरांना देतेवेळी ते दोनदा विचार करतात. तसेच जर अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास कृपया https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

ही माहिती शेअर करु नका

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.

कर्जाच्या नावाखाली फसवणूक

दरम्यान सद्यस्थितीत कर्जाच्या नावाखाली बँकेत फ्रॉड केले जात आहे. जर तुम्हाला SBI Loan Finance Ltd या नावे कोणताही फोन आला तर काळजी घ्या. हा फोन बनावट असू शकतो. याचा SBI शी काहीही संबंध नाही. अशा फेक कॉल द्वारे ते बनावट कर्जाच्या ऑफर देत आहेत, असेही SBI ने सांगितले आहे.

हेही वाचा :

Jio कडून 41 कोटी युजर्सला अलर्ट, मोफत मिळण्याच्या अमिषाने ‘ही’ चूक करु नका, नाहीतर मोठा भुर्दंड

Banking Fraud: 10 दिवसात बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे मिळणार, वाचा RBI च्या सोप्या टीप्स

सावधान, तुम्हालाही RBI गव्हर्नरच्या नावाने मेल आलाय का? ‘असं’ आहे फसवणुकीचं संपूर्ण प्रकरण

व्हिडीओ पाहा :

SBI alert customers about fraud on the name of KYC Know Your Customer message

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.