SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेकडून मेसेज आल्यास काय कराल?

SBI Bank | SBI ग्राहकांनी नेहमी "SBI/SB" ने सुरू होणारे शॉर्टकोड तपासावेत, उदाहरणार्थ SBIBNK, SBIINB, SBIPSG आणि SBINO. बँकेने आपल्या खातेधारकांना आणि इतर ग्राहकांना सतर्क केले की अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या संदेशांवर कोणताही रिप्लाय देऊ नये.

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेकडून मेसेज आल्यास काय कराल?
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 11:00 AM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. मोठ्या संख्येने वापरकर्त्यांमुळे, बँक नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी फिशिंग, हॅकिंग किंवा फसवणुकीसारखे प्रकार टाळण्यासाठी त्यांच्याशी सिक्युरिटी अपडेटस शेअर करते.

अलीकडे, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात संवेदनशील माहितीच्या माध्यमातून मजकूर संदेश लपवून बँक ग्राहकांची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. सर्व बँका नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मजकूर संदेश पाठवतात. ग्राहकांना आलेले मेसेज बँकेनेच पाठवले आहेत की नाही यासाठी SBI ने काही टिप्स शेअर केल्या आहेत. एसबीआयने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.

SBI ग्राहकांनी नेहमी “SBI/SB” ने सुरू होणारे शॉर्टकोड तपासावेत, उदाहरणार्थ SBIBNK, SBIINB, SBIPSG आणि SBINO. बँकेने आपल्या खातेधारकांना सतर्क केले की अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या संदेशांवर कोणताही रिप्लाय देऊ नये.

बँकेकडून वेळोवेळी अलर्ट जारी

एसबीआय बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी दररोज अलर्ट जारी करत असते. SBI चा उद्देश ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत असते. SBI ने कस्टमर केअर नंबर देखील जारी केला आहे. तुम्ही ग्राहक सेवा क्रमांक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधून बँकेशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता.

सोशल मीडियावर ‘ही’ माहिती शेअर केल्यास फटका बसण्याची शक्यता

भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनव्या उपाययोजना केल्या जातात. आतादेखील SBI बँकेने सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी एक नवी सूचना जारी केली आहे. त्यानुसार ग्राहकांना बँक खात्यासंदर्भातील खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अनेकदा बँकेचे ग्राहक रागाच्या भरात किंवा नकळतपणे सोशल मीडियावर पोस्ट करतात. या माहितीचा हॅकर्सकडून गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसबीआय बँकेकडून ग्राहकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

एसबीआय बँक अमिताभ बच्चन यांची भाडेकरु; महिन्याचं भाडं 18.9 लाख रुपये

पॅनकार्डधारकांना SBI बँकेचा इशारा; लवकरात लवकर ‘हे’ काम आटपा, अन्यथा…

SBI Account: बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अकाऊंट कसं ट्रान्सफर करायचं?

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.