नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया महागड्या मालमत्ता स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. एसबीआयने 25 ऑक्टोबर रोजी गहाण ठेवलेल्या मालमत्तांसाठी – दोन्ही व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांसाठी ऑनलाईन लिलाव आयोजित केला आहे. एसबीआय मेगा ई-लिलाव अंतर्गत, तुम्हाला सध्याच्या बाजार दरापेक्षा कमी किंमतीत काही घर, प्लॉट किंवा दुकान बोली लावण्याची आणि जिंकण्याची संधी आहे. एसबीआयने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
ई-लिलावासाठी ठेवलेल्या अशा मालमत्तांचा तपशील जाहिरातीत दिलेल्या लिंकद्वारे मिळू शकतो. 25 ऑक्टोबर रोजी ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. याठिकाणी ग्राहकांना कोणत्याही ब्रोकरेजशिवाय स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी मिळेल.
Your next big investment opportunity is here! Join us during the e-auction and place your best bid. Know more: https://t.co/vqhLcagoFF #Auction #EAuction #Properties #SBIMegaEAuction pic.twitter.com/e24yoxgh1C
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 13, 2021
ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.
ई लिलावात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टीची अनामत रक्कम जमा करावी लागेल. संबंधित बँक शाखेत ‘KYC डॉक्युमेंट्स’ दाखवावे लागतील.
लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजीटल सिग्नेचर आवश्यक आहे. तुम्हाला ई लिलावामध्ये अन्य अधिकृत एजन्सीद्वारेही सहभागी होता येईल.
संबंधित बँक शाखेत रक्कम जमा करुन, तुमची कागदपत्र दाखवल्यानंतर, तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. नियमावली पाळून तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
संबंधित बातम्या:
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8984 घरांसाठी आज ऑनलाइन सोडत निघणार
घर खरेदीची मोठी संधी, सणासुदीच्या काळात ‘या’ 4 बँकांनी गृहकर्जाचे दर केले कमी, पटापट तपासा
कर वाचवण्यासाठी म्युच्युअल फंडाचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवू शकतो का? नियम काय?
( SBI mega e auction for properties across India know how you can apply)