एसबीआयच्या ग्राहकांसाठी उद्यापासून हा नियम लागू होणार

मुंबई : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 1 मेपासून काही नवे नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांचा परिणाम बचत खाते आणि कमी कालावधीकरिता बँकेचं कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांच्या बचत खात्यांना ग्रहण लागणार आहे. कारण, 1 मेपासून बँकेच्या व्याजदरांत बदल होत आहे. एसबीआयने कर्ज आणि डिपॉझिट रेटला …

एसबीआयच्या ग्राहकांसाठी उद्यापासून हा नियम लागू होणार

मुंबई : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 1 मेपासून काही नवे नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांचा परिणाम बचत खाते आणि कमी कालावधीकरिता बँकेचं कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांच्या बचत खात्यांना ग्रहण लागणार आहे. कारण, 1 मेपासून बँकेच्या व्याजदरांत बदल होत आहे.

एसबीआयने कर्ज आणि डिपॉझिट रेटला सरळसरळ आरबीआयच्या रेपो रेटसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारी एसबीआय देशातील पहिली बँक आहे. एसबीआयचा हा निर्णय उद्या 1 मेपासून अंमलात आणला जाणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे बचत खाते धारकांवर विपरीत परिणाम होणार आहे.

एसबीआयमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांना आता आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळणार आहे. म्हणजे, उद्यापासून एसबीआयच्या ग्राहकांचा बचत खात्यावर कमी व्याज मिळेल. देशात अनेकांचे एसबीआयमध्ये बचत खाते आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे. पण, बँकेचं कर्ज आणि डिपॉझिट रेटला आरबीआयच्या रेपो रेटशी जोडल्याने ग्राहकांना कमी व्याजावर कर्ज मिळू शकेल.

आजवर ‘बँक मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR)’ च्या आधारे बँकेच्या कर्जाचे व्याज दर निश्चित केले जात होते. यामुळे रेपो रेट कमी झाला, तरी एमसीएलआरमध्ये कुठलाही बदल होत नव्हता. पण, आता आरबीआय जेव्हाही रेपो रेटमध्ये बदल करेल, त्याचा सरळ परिणाम तुमच्या बचत खात्यावर होणार आहे. जर आरबीआयचा रेपो रेट कमी असेल तर बचत खात्यावर कमी व्याज मिळेल.

एसबीआयच्या नवीन नियमानुसार,  1 मेपासून एक लाख रुपयांपेक्षा अधिक डिपॉझिट रकमेवर आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. नव्या नियमानुसार, एक लाखापर्यंतच्या डिपॉझिटवर 3.50 टक्के व्याज मिळेल. तर एक लाखाहून अधिकच्या डिपॉझिटवर 3.25 टक्के व्याज मिळेल.

एसबीआयचं कर्ज स्वस्त होण्याची शक्यता

एसबीआयने बँकेच्या कर्ज दराला आरबीआयच्या रेपो रेटशी जोडल्यावर ग्राहकांना बँकेचं कर्ज स्वस्तात मिळू शकेल. 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ग्राहकांना 1 मेपासून 0.10 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. सध्या 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 8.60 ते 8.90 टक्के व्याज द्यावं लागतं. याशिवाय एसबीआयने एमसीएलआरमध्येही घट केली आहे.

संबंधित बातम्या :

1 मेपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार

कर्ज काढताय? बँकेत जाण्याआधी ‘ही’ कागदपत्रं जवळ ठेवा

वेगवेगळ्या ठिकाणी जमा 70 हजार कोटी रुपयांना कुणीही वाली नाही

SBI ची ग्राहकांना बंपर ऑफर, घर खरेदीवर 2.67 लाख रुपयांची सूट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *