AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजारात आपटी बार, सेन्सेक्समध्ये 774 अंकांची घसरण

Share Market : शेअर बाजारात घसरणीचा बॉम्ब फुटल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

Share Market : शेअर बाजारात आपटी बार, सेन्सेक्समध्ये 774 अंकांची घसरण
| Updated on: Jan 25, 2023 | 9:54 PM
Share

नवी दिल्ली : आज शेअर बाजारात (Share Market) आपटी बार पडला. शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये जवळपास 773.69 अंकांची घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 60205.06 अंकावर बंद झाला. तर 226.30 अंकांची घसरण होऊन निफ्टी (Nifty) 17892.00 अंकावर बंद झाला. बीएसईमध्ये (BSE) एकूण 3,646 कंपन्या ट्रेडिंग करत होत्या. त्यातील जवळपास 1,136 कंपन्यांचे शेअर तेजीत होते. तर 2,378 शेअरमध्ये घसरणीसह बंद झाला. तर 132 कंपन्यांच्या शेअरमध्ये कोणताही फरक पडला नाही. आज 119 स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. 109 स्टॉक 52 आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावर बंद झाले. तर 185 शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. तर 193 शेअरमध्ये लोअर सर्किट लागले.

आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी मजबूत होत 81.59 रुपयांवर बंद झाला. निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये मारुती सुझुकी अग्रभागी होती. 85 रुपयांच्या तेजीसह हा शेअर 8,784.10 रुपयांवर बंद झाला. हिन्डाल्कोच्या शेअर जवळपास 4 रुपयांनी वधारला. हा शेअर 489.10 रुपयांवर बंद झाला.

एचयुएलचा शेअर जवळपास 22 रुपयांच्या तेजीसह 2,622.35 रुपयांवर बंद झाला. बजाज ऑटोचा शेअर जवळपास 31 रुपयांच्या तेजीसह 3,717.40 रुपयांवर बंद झाला. टाटा स्टीलचा शेअर एक रुपयाच्या तेजीसह 121.00 रुपयांच्या स्तरावर बंद झाला.

निफ्टीतील टॉप लूझरमध्ये अदानी पोर्टसचा शेअर जवळपास 48 रुपयांची घसला आणि 713.15 रुपयांवर बंद झाला. इंडसइंड बँकाचा शेअर जवळपास 56 रुपयांनी घसरुन 1,156.15 रुपयांवर बंद झाला. सिपलाचा शेअर जवळपास 27 रुपयांची घसरण होऊन 1,035.25 रुपयांवर बंद झाला.

एसबीआयच्या शेअरनेही निराशा केली. शेअरमध्ये 26 रुपयांची घसरण होऊन 568.70 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. एचडीएफसी बँकेचा शेअरमध्ये जवळपास 47 रुपयांची घसरण होऊन हा शेअर 1,648.65 रुपयांवर बंद झाला.

बजेट काळात हे शेअर कमाई करुन देऊ शकतात. इंजिनअरिंग आणि बांधकाम क्षेत्राला बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.या क्षेत्रात लार्सन अँड ट्रब्रो (Larsen & Toubro) ही एक प्रमुख कंपनी आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

देशात वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. केंद्र सरकारच्या वतीने वाहन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे. ग्रामीण भागात दुचाकीची मागणी मोठी आहे. त्यासाठी केंद्र सरकार काही मदत जाहीर करु शकते. त्याचा फायदा हिरो मोटोकॉर्पोला (Hero MotoCorp) होऊ शकतो.

या बजेटमध्ये केंद्र सरकार पायाभूत सोयी-सुविधांवर भर देऊ शकते. इन्फ्रास्ट्रक्चरवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो. या कंपन्यांमध्ये एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग ( HG Infra Engineering) या कंपनीचा शेअर कमाल करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार या अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेशी संबंधित कंपन्यांना मठा फायदा होऊ शकतो. रेल्वेच्या विकासाशी जोडलेली कंपनी IRCON ला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये त्यादृष्टीने घोषणा झाल्यास गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळू शकते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.