Multibagger Stock : 49 हजार रुपयांचे झाले 1 कोटी! कोट्याधीश करणारा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 6:12 PM

Multibagger Stock : शेअर बाजारात या कंपनीने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूकीत जोरदार परतावा दिला.

Multibagger Stock : 49 हजार रुपयांचे झाले 1 कोटी! कोट्याधीश करणारा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) चढउताराचे सत्र सुरु असते. बाजाराची दिशा काही का असेना एखादा स्टॉक कमाल करतो. गुंतवणूकदार मालामाल होतात. अल्प गुंतवणूकही कधी कधी जोरदार परतावा देऊन जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना (Long Term Investment) याचा प्रत्यय येतो. अशीच एका आयटी कंपनीने कमाल केली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या कंपनीने जोरदार परतावा दिला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले आहे. आयटी सेवा पुरवणारी कंपनी एम्फेसिसच्या शेअरने (Mphasis Share) 22 वर्षांत गुंतवणूकदारांचे नशीब उघडले.

आयटी सेवा देणारी कंपनी एम्फेसिसच्या शेअरने गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले. 22 वर्षांपूर्वी या कंपनीत एखाद्या गुंतवणूकदारांने 50 हजारांची गुंतवणूक करुन तशीच ठेवली असती तर तो मालामाल झाला असता. या 22 वर्षांत आयटी स्टॉकने जबरदस्त 20411 टक्क्यांची वाढ नोंदवली. गेल्या एका वर्षांत या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.

या शेअरचा सध्याचा भाव जाणून घेऊयात. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये या शेअरमध्ये 2.5 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. हा शेअर मंगळवारी 2110.55 रुपयांच्या किंमतींवर बंद झाला. तर बुधवारी शेअर बाजारात घसरणीचे सत्र असतानाही या शेअरने कमाल केली.

यापूर्वी, 22 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ 10 रुपये होती. त्यानंतर कंपनीचा विस्तार झाला. शेअर बाजारात या शेअरची किंमतीत वाढ होत गेली. प्रत्येक टप्प्यावर शेअरची आगेकूच सुरु होती. या 22 वर्षांत शेअर आता 2110.55 रुपयांच्या आतबाहेर आहे.

19 ऑक्टोबर 2001 रोजी या शेअरची किंमत केवळ 10.29 रुपये होती. त्यात आता 20411 टक्क्यांची वाढ झाली. एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये त्यावेळी 49 हजारांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये असती. या शेअरने कितीतरी पट परतावा दिला आहे.

गेल्या वर्षी या शेअरने सर्वकालीन उच्चांक गाठला. हा शेअर गेल्यावर्षी मार्च महिन्यात 3466.40 रुपयांवर पोहचला होता. तर या शेअरची 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 1897 रुपये आहे. त्यानंतर या शेअरने पुन्हा उचल खाल्ली. मंगळवारी या शेअरचा भाव 2110.55 रुपये होता.

हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची ही माहिती आहे. गुंतवणुकीपूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI