Share Market: गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस, 1 लाखाचे बनले सव्वा 3 कोटी
जागतिक पातळीवर युद्धस्थिती निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे.मात्र काही असे शेअर्स आहेत, ज्यामुळे काहीजण मालामाल बनले आहेत.

जागतिक पातळीवर युद्धस्थिती निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे बऱ्यांच गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आहे. मात्र काही असे शेअर्स आहेत, ज्यामुळे काहीजण मालामाल बनले आहेत. आज आपण अशा एका शेअरची माहिती जाणून घेऊयात ज्याने गुंतवणूकदारांवर धनवर्षा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हजूर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. जून 2020 मध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरची किंमत 0.12 रुपये होती. मात्र आता हा शेअर 39-19 रुपयांवर व्यवहार करत आहे. याचाच अर्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तो आता 3.32 कोटींचा मालक बनला असता. या शेअरने 5 वर्षांत 33,075 % पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
सहा महिन्यांपासून घसरण
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरने गुतवणूकदारांना मालामाल बनवले असले तरी गेल्या 6 महिन्यांमध्ये शेअरच्या किमतीत 17 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 2025 च्या सुरुवातीपासून या शेअर्सची किंमत 25 टक्क्यांनी घसरली असून हा शेअर 53.43 रुपयांवरुन 36.19 वर आली आहे.
कंपनीच्या नफ्यात घट
समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नफ्यात 69 टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीचा नफा 53.93 कोटींवरून 16.78 कोटींवर आला आहे. तसेच कंपनीला कोअर रिअल इस्टेट ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल घटला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत 46 % ने घटून 249 कोटी रुपये झाला आहे.
टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख वाचून एखाद्याने गुंतवणूक केल्यास, आणि त्याला आर्थिक फटका बसल्यास टीव्ही 9 मराठी जबाबदार असणार नाही.
