Share Market | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! 1 स्टॉकवर 20 रुपयांचा डिव्हिडंड देणार हा पेनी शेअर

Share Market | शेअर बाजारातील या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या या शेअरने त्यांना मालामाल केले. त्यांना 4 बोनस शेअर दिले आणि आता एक शेअरवर ही कंपनी शेअरधारकांना 20 रुपयांचा डिव्हिडंड पण देणार आहे. कोणती आहे ही कंपनी?

Share Market | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! 1 स्टॉकवर 20 रुपयांचा डिव्हिडंड देणार हा पेनी शेअर
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 4:12 PM

नवी दिल्ली | 17 February 2024 : शेअर बाजारात या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना आनंदवार्ता दिली आहे. पेनी स्टॉक टापरिया टुल्सने (Taparia Tools) यापूर्वी गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. यापूर्वी कंपनीने 4 बोनस शेअरचे गिफ्ट पण दिले आहे. आता कंपनी शेअरधारकांना एका शेअरवर 20 रुपयांचा लाभांश देणार आहे. त्यासाठी टापरिया कंपनीने रेकॉर्ड डेट पण जाहीर केली आहे. शेअरधारकांच्या दृष्टीने एक महत्वाची बाब म्हणजे ही रेकॉर्ड डेट फेब्रुवारी महिन्यात असेल. कंपनीने आतापर्यंत 4 बोनस शेअरचे वाटप केले आहे. चॉकलेटच्या किंमतीत येणाऱ्या या शेअरच्या कंपनीने दिग्गज कंपन्यांपेक्षा चांगला परतावा दिला आहे.

1 शेअरवर 200 टक्के लाभांश

12 फेब्रुवारी रोजी कंपनीने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 200 टक्क्यांचा अंतरिम लाभांश देण्यात येणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना एक शेअरवर ही कंपनी 20 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. या लाभांशसाठी रेकॉर्ड डेट 24 फेब्रुवारी 2024 ही निश्चित करण्यात आली आहे. ज्या शेअरधारकाकडे या दिवशी कंपनीचे शेअर असतील. त्यांनाच डिव्हिडंडचा लाभ देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी दिला बोनस शेअर

  • कंपनीने यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये एक्स-बोनस स्टॉक दिला आहे. त्यावेळी कंपनीने 1 शेअरवर 4 बोनस शेअर दिले होते. कंपनीने पहिल्यांदा 2002 मध्ये डिव्हिडंड दिला होता. तेव्हा कंपनीने गुंतणूकदारांना एका शेअरवर 1 रुपयांचा लाभांश घोषीत केला होता.
  • 2023 मध्ये कंपनीने 2 वेळा डिव्हिडंड दिला आहे. कंपनीने नियमीत कालावधीत लाभांश दिला आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचा भाव 3.06 रुपये होता. हा कंपनीचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 2.10 रुपये आहे. टापरिया टुल्सचे मार्केट कॅप 4.64 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.