AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Split : स्टॉकचे होतील 10 तुकडे, घोषणेनंतर रॉकेट झाला हा शेअर

Stock Split : या कंपनीचा शेअर सध्या चर्चेत आहे. स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा झाल्यापासून गुंतवणूकदार जाम खूश झाले आहेत. या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. या शेअरने चांगली मुसंडी मारली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली. तेव्हापासून शेअर तेजीत आहे.

Stock Split : स्टॉकचे होतील 10 तुकडे, घोषणेनंतर रॉकेट झाला हा शेअर
| Updated on: Oct 05, 2023 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) सातत्याने चढउतार सुरु आहेत. गुंतवणूकदारांना सलग तेजीच्या सत्राची आवश्यकता वाटत आहे. सणासुदीत बाजारातील ही परिस्थिती काहींच्या जीवाला घोर लावणारी आहे. या दरम्यान काही कंपन्या गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता घेऊन येत आहे. काही कंपन्या लाभांश जाहीर करत आहेत. तर काही कंपन्या बोनस शेअरचे गिफ्ट देत आहेत. या कंपनीने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27 ऑक्टोबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे गुरुवारी या शेअरमध्ये खरेदीची लाट आली. शेअर बाजार सुरु होताच, गुंतवणूकदार तुटून पडले. काही मिनिटातच हा स्मॉल कॅप शेअर तेजीत आला. हा शेअर NSE इंट्राडेवर 523 रुपये प्रति शेअरवर पोहचला.

कोणती आहे ही कंपनी

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (BCL Industries) संचालक मंडळाने बुधवारी शेअर स्प्लिट (Stock Split) करण्याचा निर्णय जाहीर केला. या कंपनीने शेअरला 1:10 या प्रमाणात शेअरची विभागणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक शेअरचे 10 तुकडे, वाटे, हिस्से करण्यासाठी 27 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. याविषयीचा प्रस्ताव कंपनीने मंजूर केला. सध्या प्रत्येक शेअरचे मूल्य 10 रुपये आहे. विभाजनानंतर हा प्रत्येक शेअर एक रुपयांचा होईल.

शेअरची कामगिरी

हा स्मॉल कॅप स्टॉक 2023 मध्ये जोरात धावला. त्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. हा स्मॉल कॅप स्टॉक जवळपास 324 रुपयांवर होता. त्यानंतर हा शेअर 517 रुपये प्रति शेअरवर पोहचला. या शेअरमध्ये 60 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक 325 टक्क्यांनी वाढला. म्हणजे या शेअरने मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत.

हा स्टॉक पण तेजीत

मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोलकेमिकल्स लिमिटेड (MRPL) हा शेअर गेल्या तीन वर्षांत 283% वधारला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. बिर्ला समहू आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांचा हा संयुक्त उद्योग आहे.कंपनीचे मुख्य कार्य कच्चा तेलाचा शोध घेणे, पेट्रोकेमिकल्स, विमानाच्या इंधनाचा व्यापार आणि रिटेल आऊटलेटसह इतर पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन करणे आणि त्यांचे वितरण करणे हा आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.