AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिम कार्ड, LPG, रेल्वे ॲप.. 1 मार्चपासून कोणते नियम बदलणार?

1 मार्च 2026 पासून बरेच नियम बदलणार आहेत. सिम कार्ड, एलपीजी, सीएनजी, पीएनजीचे दर, रेल्वे अॅपमधील बदल यांसंंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हे नवे नियम काय असतील, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

सिम कार्ड, LPG, रेल्वे ॲप.. 1 मार्चपासून कोणते नियम बदलणार?
एलपीजी, रेल्वे, सिम कार्डImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 9:38 AM
Share

दर महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. 1 मार्च 2026 पासून अनेक नियम बदलणार आहेत. सिम कार्डपासून रेल्वेपर्यंतच्या अनेक नियमांचा त्यात समावेश आहे. मोबाइल युजर्ससाठी ही एक महत्त्वाची अपडेट असेल. कारण सिम बाइंडिंग 1 मार्च 2026 पासून लागू होईल. या नियमानुसार आता व्हॉट्स ॲप आणि इतर मेसेजिंग ॲप अकाऊंट सक्रिय असलेल्या सिम कार्डशी लिंक करणं बंधनकारक असेल. हे ॲप्स चालवणाऱ्या मोबाइल फोनमध्येदेखील सिम कार्ड असणं आवश्यक आहे.

1 मार्च 2026 पासून रेल्वे त्यांचा जुना युटीएस ॲप बंद करत आहे. प्रवाशांना आता ते वापरता येणार नाही. त्याऐवजी प्रवाशांना रेलवन हे नवीन ॲप वापरावं लागणार आहे. या ॲपमुळे प्रवाशांना अनारक्षित तिकिटं आणि प्लॅटफॉर्म तिकिटं बुक करता येतील. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन एलपीजी किंमती जाहीर केल्या जातात. होळीचा सण असल्याने सरकार एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी करेल अशी लोकांना आशा आहे. सिलेंडरच्या नव्या दरांबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. किंमती कमी करण्याबाबत सरकार काही निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1 मार्च 2026 रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींबाबत मोठी अपडेट जाहीर केली जाणार आहे. सरकार 1 मार्च रोजी नवीन किंमती जाहीर करण्याची अपेक्षा आहे. एटीएफच्या किंमतीदेखील जाहीर केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिनिमम बॅलेन्सच्या आवश्यकतांबाबत जनतेला मोठा दिलासा दिला आहे. खात्यातील मिनिमम बॅलेन्सची आवश्यकता आता मासिक सरासरीनुसार निश्चित केली जाईल. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला तुमचा बँक बॅलेन्स जरी कमी असला तरी तुम्ही महिन्याच्या अखेरीस ती मॅनेज करू शकता.

देशभरात डिजिटल, युपीआय व्यवहार वाढले असून त्यामुळे होणारी फसवणुकीची प्रकरणंही वाढली आहेत. ही फसवणूक होऊ नये म्हणून सुरक्षेचे नियम कडक केले जाऊ शकतात. यासाठी बँका मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी लागू करण्याची तयारी करत आहेत. म्हणजेच आता ट्रान्सॅक्शनसाठी फक्त UPI पिन वापरणं पुरेसं नाही.

Follow Us
नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट! 25 कर्मचारी अडकले
नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट! 25 कर्मचारी अडकले.
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.