अर्थसंकल्पापूर्वीच रेल्वे शेअरची गरुड भरारी; गुंतवणूकीची केली का तयारी

Budget Railway Stocks | गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सरकारी कंपन्या मोठी घौडदौड करणार असल्याचे लोकसभेत सांगितले होते. त्यानंतर सरकारी सेक्टरमधील अनेक कंपन्यांनी मोठा पल्ला गाठला. त्याला रेल्वे सेक्टर पण अपवाद राहिले नाही. हा शेअर सध्या तेजीत आहे.

अर्थसंकल्पापूर्वीच रेल्वे शेअरची गरुड भरारी; गुंतवणूकीची केली का तयारी
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 3:48 PM

नवी दिल्ली | 20 January 2024 : शेअर बाजारात सरकारी क्षेत्रातील कंपन्यांनी उधाण आणले आहे. सरकारी बॅकिंग, नवरत्न कंपनी, मिनी रत्न कंपन्या, रेल्वे सेक्टरने गेल्या वर्षात मोठी कमाल केली. सध्या रेल्वे क्षेत्रातील कंपन्या मैदान गाजवत आहे. बाजारात पडझडीचे सत्र असले तरी रेल्वे सेक्टरमध्ये चढाईचे सत्र आहे. रेल्वे विकास निगम, IRFC, IRCON च्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. IRCON चा शेअर 15 टक्क्यांची उसळी दिसून आली. या शेअरने यंदा नवीन उच्चांक गाठला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी रेल्वे सेक्टरमध्ये तेजीचे वारे आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरने उसळी घेतली आहे.

जानेवारीत 45 टक्क्यांची वाढ

IRCON चा शेअर शनिवारी सकाळी विशेष ट्रेडिंग सत्रात 231.35 रुपयांवर उघडला. पण काही वेळातच हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 261.35 रुपयांवर पोहचला. जानेवारी महिन्यात या कंपनीचा शेअर 45 टक्क्यांनी वाढला. या शेअरने यंदा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

हे सुद्धा वाचा

6 महिन्यात पैसा दुप्पट

IRCON चे शेअर गेल्या एका वर्षात 276 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 52 आठवड्यातील निच्चांकावर 50.15 रुपयांवर पोहचला होता. गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी रोजी त्याने हा निच्चांक गाठला होता. त्यानंतर हा शेअर 421 टक्क्यांनी वधारला. गेल्या 6 महिन्यात कंपनीचा शेअर 187 टक्क्यांच्या तेजीसह आगेकूच करत आहे.

इतर रेल्वे शेअरमध्ये पण तेजी

IRCON च नाही तर, या सेक्टरमधील रेल्वे विकास निगमच्या शेअर्सनी पण आज 10 टक्क्यांची उसळी घेतली. कंपनीचे शेअर आता 320.75 रुपयांच्या स्तरावर पोहचले आहेत. तर आयआरएफसी च्या शेअरचा भाव 9.7 टक्क्यांनी वाढला. रेल्वे टेल या कंपनीचा शेअर पण वधारला. रेल्वे टेलचा शेअर आता 417.80 रुपयांवर पोहचला आहे. तर IRCTC चा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला आहे. एकूणच रेल्वेशी संबंधित स्टॉकमधली ही तेजी आगामी बजेटमध्ये या सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची नांदी ठरणार आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. 

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.