गौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप

उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या एनपीएवरुन (Gautam Adani) चांगलेच चर्चेत आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हाच मुद्दा पकडत अदानींवर हल्ला चढवलाय.

गौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप
भारतमाला योजनेतंर्गत या महामार्गाचे काम केले जाणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 12:37 AM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन परफॉर्मिंग अॅसेट्सबाबत (NPA) रेड फ्लॅग जारी केलाय. यात सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा एकूण एनपीए 13.5 टक्क्यांवर पोहचलाय. सप्टेंबर 2020 पर्यंत हा केवळ 7.5 टक्के होता. त्यामुळेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास बॅड बँक (Shaktikanta Das on Bad bank) करण्यावर विचार करत आहेत. यानंतर उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या एनपीएवरुन (Gautam Adani) चांगलेच चर्चेत आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हाच मुद्दा पकडत अदानींवर हल्ला चढवलाय. स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये अदानी यांच्यावर बँकांचा जवळपास 4.5 लाख कोटी रुपयांचा एनपीए असल्याचा आरोप केलाय (Subramanian Swamy allegations of NPA on Adani Group after RBI report).

सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी शुक्रवारी अदानी समुहाच्या एनपीएवर (Adani Group NPA) ट्विट करत म्हटलं, “अदानी समुहावर सध्या बँकांची 4.5 लाख कोटी रुपये एनपीए आहे. मी चुकीचा असेल तर त्यात सुधारणा करा. असं असतानाही 2016 मध्ये त्यांची संपत्ती प्रत्येक 2 वर्षांनी दुप्पट होते. मग ते बँकांचे कर्ज का फेडत नाहीये. त्यांनी 6 एअरपोर्ट खरेदी केले. तसेच ते आता ज्या बँकांचे कर्ज थकीत आहे त्यांनाही विकत घेतील.”

स्वामींच्या आरोपांवर अदानी समुहाकडून स्पष्टीकरण

स्वामींच्या आरोपांनंतर अदानी समुहाने आपली भूमिका स्पष्ट केलीय. अदानी समुहाने म्हटलं, “अदानी समुहाचं रेकॉर्ड निष्कलंक आहे. 3 दशकात कंपनीचं एकही कर्ज एनपीए झालेलं नाही. अदानी समुहावर केलेल्या आरोपांमधील आकडेवारी चुकीची आणि कल्पानिक आहे. कंपनी कर्ज न फेडण्याचे आरोप फेटाळते. कंपनी अस्तित्वात येऊन 3 दशक झालेत. तेव्हापासून कंपनीचा इतिहास निष्कलंक आहे. एकाही बँकेचं कर्ज एनपीए होऊ दिलेलं नाही.”

अदानी समुहाने ट्विटरवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे, “अदानी समुहाने देशात मोठ्या प्रमाणात संपत्तीची निर्मिती केली. तसेच यासाठी योग्य व्यवस्थापन आणि आर्थिक गुंतवणुकीच्या योग्य प्रक्रियांचा उपयोग करण्यात आलाय.”

हेही वाचा :

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल

अदानी ग्रुपवर 17 अब्ज डॉलरचं कर्ज, तरीही गौतम अदानी 2.3 लाख कोटींचे मालक कसे? जाणून घ्या…

कोरोना काळातही गौतम अदानींनी दिवसाला कमावले 456 कोटी रुपये, मुकेश अंबानी, बिल गेट्स यांनाही मागे टाकलं!

व्हिडीओ पाहा :

Subramanian Swamy allegations of NPA on Adani Group after RBI report

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.