देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी TCS ची चांदी, तिमाहीत 9,008 कोटींचा जबरदस्त नफा

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी TCS ची चांदी, तिमाहीत 9,008 कोटींचा जबरदस्त नफा
टाटाची ही कंपनी देते 5 लाख लोकांना रोजगार, जाणून घ्या येथे नोकरी कशी मिळवायची ते

शातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने Tata Consultancy Services ने चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 09, 2021 | 11:22 AM

मुंबई : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने Tata Consultancy Services ने चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा 28.5 टक्क्यांनी वाढून 9,008 कोटी रुपये झाला. यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 7,008 कोटींचा नफा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्नही 18.5 टक्क्यांनी वाढून 45,411 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान एक वर्षापूर्वी याच तिमाहीत हेच उत्पन्न 38,322 कोटी रुपये इतके होते. (TCS profit rose to 9,008 Rupees crore in the three months reports 28.5% jump in Q1net profit)

“सहकाऱ्यांमुळे सकारात्मक परिणाम” 

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “उत्तर अमेरिकेतील आमचा व्यवसाय, बीएफएसआय (बँक, वित्तीय सेवा आणि विमा) आणि किरकोळ व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. यामुळे कोरोना काळातही कंपनीची स्थिती मजबूत असल्याचे दर्शवत आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इतर सहकार्यांनी याला पूर्ण उत्साहाने योगदान दिले आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मुख्य बाजारपेठ तसेच कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल याबाबत आम्ही आशावादी आहोत, असेही ते म्हणाले.

20 हजार नवीन कर्मचाऱ्यांना नोकऱ्या 

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये देशात अनेक उतार चढाव पाहायला मिळाले. पण या कठीण काळात कंपनीने बर्‍याच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले आहे. खरं तर, टीसीएसने कोरोना कालावधीत सुमारे 20,409 नवीन कर्मचार्‍यांना नोकर्‍या दिल्या. यामुळे कर्मचार्‍यांची संख्या 5 लाख 09 हजार 058 वर गेली आहे.

या कंपनीतील सर्व कर्मचारी एकमेकांना मदत करतात. तसेच ग्राहकांच्या प्रती त्यांचे कर्तव्यही उत्तम प्रकारे निभावतात, असेही गोपीनाथन यांनी सांगितले.

(TCS profit rose to 9,008 Rupees crore in the three months reports 28.5% jump in Q1net profit)

संबंधित बातम्या : 

विमा कंपनीने तुमचाही क्लेम फेटाळलाय? तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये आज मोठी घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा अजूनही 8,750 रुपयांनी स्वस्त

SBI बँकेत फोनद्वारे अवघ्या 10 मिनिटात उघडा खाते, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें