Cheapest Petrol Rate : मुंबईत एक लिटर पेट्रोल 103 रुपये पण या देशात प्रति लिटर पेट्रोल फक्त 2.50 रुपये, कुठे आहे हा देश?
Cheapest Petrol Rate : जगाच्या पाठिवर असे अनेक देश आहेत, ज्यांच्यासाठी पेट्रोलच्या किंमती खूप महत्त्वाच्या आहेत. एखाद्या देशात सत्ता परिवर्तनासाठी कच्चा तेलाचे दर कारणीभूत ठरतात. भारतात महागाई तेलांच्या दरांशी संबंधित आहे. मुंबईत आज एक लिटर पेट्रोलचा दर 103 रुपये आहे. पण त्याचवेळी असाही एक देश आहे, जिथे एक लिटर पेट्रोलचा दर 2.50 रुपयांपेक्षा पण कमी आहे.

जागतिक तणावामुळे सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात बरेच चढ-उतार पहायला मिळतायत. भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरांवर भू-राजकीय तणावाचा परिणाम पहायला मिळतोय. पण तुम्हाला माहित आहे का? जगात असाही एक देश आहे, जिथे अडीच रुपयांपेक्षा कमी किंमतीत गॅसोलीन म्हणजे पेट्रोल मिळतं. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा आजचा दर 103 रुपये आहे. तेच जगाच्या पाठिवर असाही एक देश आहे, जिथे प्रतिलिटर पेट्रोलचा भाव फक्त 2 रुपये 45 पैसे. तो कोणता देश आहे? जगाच्या पाठिवर कुठे असा देश आहे? जाणून घ्या.
ग्लोबल पेट्रोल प्राइस 11 ऑगस्ट 2025 च्या डेटानुसार, लीबियामध्ये पेट्रोलची किंमत 2.45 रुपये प्रति लिटर आहे. इथे अडीच रुपयांपेक्षा कमी किंमतीत पेट्रोल मिळतं. पेट्रोलला काळ सोनं म्हटलं जातं. ग्लोबल पेट्रोल प्राइस डेटावर वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने एक टेबल तयार केलय. यात म्हटलय की, सर्वात स्वस्त ऑइल लीबियामध्ये मिळतं. त्यानंतर इराण, वेनेजुएला या देशांची नावं येतात.
कुठल्या देशांमध्ये स्वस्तात पेट्रोल मिळतं?
रिपोर्टनुसार, स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत लीबिया नंतर इराणच दुसरं नाव येतं. तिथे प्रतिलिटर ऑईलची किंमत 2.54 रुपये आहे. त्यानंतर वेनेजुएलाचा नंबर लागतो. तिथे एक लिटर ऑईलची किंमत 3.07 रुपये आहे. वेनेजुएलानंतर कुवैत, अल्जीरिया, इजिप्त, कझाकिस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांचा नंबर लागतो. स्वस्त तेलासाठी इराण आणि वेनेजुएला नाव येतं. हे देश जगातील इतर देशांना तेलाची निर्यात करतात. लीबियाने त्यांच्या देशात असलेल्या तेल दराच्या बाबतीत इतर देशांना मागे सोडलय.
भौगोलिक स्थिती काय?
लीबियाच्या भौगोलिक स्थितीबद्दल बोलायच झाल्यास हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. इथे तेल भंडार आहे. उत्तरेत भूमध्य सागर आणि पूर्वेला इजिप्तला लागून लीबियाची सीमा आहे. पश्चिमेला ट्यूनीशिया, अल्जीरिया दक्षिणेला नाइजर, चाड आणि सूडानला सीमा मिळते.
