स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; एअर इंडिया करणार मालमत्तेचा लिलाव, ऑनलाईन बोली लागणार

एअर इंडिया देशातील 10 मोठ्या शहरांमधील आपल्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यासाठी कंपनी ऑनलाईन लिलावाचे आयोजन करणार आहे. (The opportunity to buy a cheap home; Air India to auction property, bid online)

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; एअर इंडिया करणार मालमत्तेचा लिलाव, ऑनलाईन बोली लागणार
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 3:18 PM

नवी दिल्ली : कर्जबाजारी एअर इंडियाने पुन्हा एकदा आपली काही स्थावर मालमत्ता विक्कीस काढली आहे. यापैकी काही मालमत्ता आरक्षित किंमत कमी करून पुन्हा लिलावात आणल्या जातील. या माध्यमातून कंपनी आपले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करेल. कंपनीच्या या ऑफरमुळे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आपण स्वस्त दरात लक्झरी फ्लॅट्स खरेदी करू शकता. यासाठी 8 आणि 9 जुलै रोजी ऑनलाईन बोली लावण्यात येणार आहे. (The opportunity to buy a cheap home; Air India to auction property, bid online)

10 मोठ्या शहरांमधील मालमत्तांचा लिलाव

एअर इंडिया देशातील 10 मोठ्या शहरांमधील आपल्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यासाठी कंपनी ऑनलाईन लिलावाचे आयोजन करणार आहे. एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिटची प्रारंभिक बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू होईल.

या शहरांमध्ये उपलब्ध असतील फ्लॅट

एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील बुकिंग कार्यालय व स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील 6 फ्लॅट्स, नागपुरातील बुकिंग कार्यालय, एअरलाइन्स हाऊस व भुजमधील एक निवासी भूखंड व तिरुअनंतपुरम मधील एक निवासी भूखंड लिलावासाठी उपलब्ध आहेत. यापूर्वीच्या अनेक वेळा या लिलावाच्या स्लॉटमध्ये अशा अनेक मालमत्ता ठेवल्या गेल्या आहेत.

10 टक्क्यांपर्यंत सूट

माध्यमांच्या वृत्तानुसार कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, निवडलेल्या मालमत्तांमध्ये विशेषत: टियर 1 शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करण्यावर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकेल. कारण येथे राखीव किंमत कमी करण्यात आली आहे. लिलावात समाविष्ट करावयाच्या मालमत्ता निवासी आणि व्यावसायिक दोन्ही असतील. (The opportunity to buy a cheap home; Air India to auction property, bid online)

इतर बातम्या

एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार; आदित्य ठाकरे यांचं सूतोवाच

ऑनलाईन शस्त्रास्त्र तस्करी, 49 तलवारींसह धारदार शस्त्रं जप्त, औरंगाबादेत आरोपी ताब्यात

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.