LPG सिलेंडर होणार स्वस्त; लोकसभा रणसंग्रामापूर्वीच ग्राहकांना दिलासा मिळण्याचे संकेत

LPG Price : उद्या 1 एप्रिल आहे. हा दिन जगात एप्रिल फूल म्हणून ओळखल्या जातो. पण उद्याच भारतीय ग्राहकाला गॅस सिलेंडर स्वस्ताईचे गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते. देशात 1 तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो.

LPG सिलेंडर होणार स्वस्त; लोकसभा रणसंग्रामापूर्वीच ग्राहकांना दिलासा मिळण्याचे संकेत
ग्राहकांना मिळणार दिलासा, एलपीजी सिलेंडर होऊ शकतो स्वस्त
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 4:06 PM

उद्या 1 एप्रिल आहे. हा दिवस जगात एप्रिल फूल नावाने पण ओळखल्या जातो. तर 1 तारखेला अनेक बदल होतात. पेट्रोल-डिझेलपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत अनेक वस्तूंचे भाव बदलतात. यावेळी तर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षे सुरु होत आहे. त्यात उद्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमती तिप्पटीवर पोहचल्या. 400 रुपयांना मिळणार गॅस थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचला होता. गेल्या सहा महिन्यात त्यात दोनदा कपात झाली. 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत सध्या 930 रुपयांच्या आत आहे. त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत.

100 रुपयांची कपात

मार्च महिन्यात जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. नारी शक्तीला नमन करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपाताची घोषणा केली. 1 मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली. पण घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. 8 मार्च रोजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली.

हे सुद्धा वाचा

300 रुपयांची सबसिडी

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 रोजी मोठी घोषणा केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले. तर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. मार्च महिन्यातील 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे.

सात महिन्यांपासून दरवाढीला ब्रेक 

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  1 एप्रिल रोजी त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत. आता  हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.