‘या’ तीन बँकाच्या ग्राहकांसाठी खुशखबर; ATM मधून कितीही वेळा पैसे काढता येणार

त्यामुळे विनामूल्य मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. यामुळे एटीएम ग्राहकांना लवकरच झटका बसणार आहे. (These banks offering unlimited free ATM transactions across India)

'या' तीन बँकाच्या ग्राहकांसाठी खुशखबर; ATM मधून कितीही वेळा पैसे काढता येणार
ATM
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 3:14 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारसंदर्भातील नियमावलीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्यास परवानगी दिली. त्यामुळे विनामूल्य मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. यामुळे एटीएम ग्राहकांना लवकरच झटका बसणार आहे. (These banks offering unlimited free ATM transactions across India)

सध्या भारतातील बहुतेक खासगी आणि सरकारी बँका शहरांमध्ये 3 ते 5 विनामूल्य एटीएम व्यवहारास परवानगी देतात. तर, ग्रामीण भागात बँका जास्तीत जास्त 5 विनामूल्य एटीएम व्यवहारास परवानगी देतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर कोणतीही बँक एटीएम व्यवहार चालू ठेवण्यासाठी शुल्क आकारतात. मात्र अद्याप अशा काही बँका आहेत, ज्या ग्राहकांना अनलिमिटेड विनामूल्य एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देतात.

शुल्कवाढ किती?

आरबीआयच्या नव्या अहवालानुसार, येत्या 1 ऑगस्ट 2021 पासून आरबीआयने एटीएममधून आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता ही फी 15 रुपयांहून 17 रुपये करण्यात आली आहे. तर बिगर-आर्थिक व्यवहारासाठी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे.

विशेष म्हणजे येत्या 1 जानेवारी 2022 पासून बँकांना ग्राहकांकडून 21 रुपये शुल्क घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या सर्व बँकांना जास्तीत जास्त 20 रुपये शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली आहे

अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहारांची ऑफर

मात्र अद्याप देशातील तीन खासगी बँका आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहारांची ऑफर देत आहेत. यात इंडसइंड बँक (IndusInd Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि सिटी बँक (Citi Bank) या तीन बँकांचा समावेश आहे.

सिटी बँक सध्या भारतात आपला व्यवसाय वाढवित आहे. त्यामुळे अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहारांची ऑफर दिली जात आहे. तर आयडीबीआय बँक आणि इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना देशभरात विनामूल्य अमर्यादित एटीएम व्यवहारांची ऑफर देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आयडीबीआय ग्राहक असाल किंवा तुम्ही त्या बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही बँक स्वत:च्या एटीएमवर फ्री अनलिमिटेड व्यवहार करण्याची ऑफर देत आहे. तर इतर बँकांच्या एटीएमवर केवळ 5 मर्यादित व्यवहार करण्याची परवानगी देत आहे.

तर इंडसइंड बँक भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएमवर फ्री अनलिमिटेड एटीएम व्यवहार करण्याची संधी देते. बँकेच्या वेबसाईटनुसार, आपण भारतातील कोणत्याही एटीएमवर इंडसइंड बँक डेबिट कार्डद्वारे अनलिमिटेड फ्री एटीएम पैसे काढू शकता. (These banks  offering unlimited free ATM transactions across India)

संबंधित बातम्या :

PHOTO | पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच होईल लाखोंची कमाई

PPF Vs Sukanya Samriddhi Scheme | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता, कोणती योजना उत्तम, कुठे सर्वाधिक फायदा, जाणून घ्या सर्व माहिती

मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.