हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या गळाभेटीची जगभरात चर्चा झाली. आता याहून अधिक चर्चा होत आहे अमेरिकेची ओळख असलेल्या हार्ले डेविडसन बाईकवरील कर वाढीच्या मुद्द्याची. ट्रम्प यांनी भारताला जगातील सर्वाधिक कर लावणार देश म्हणत हा मूर्खपणाचा व्यापार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे विधान राष्ट्रीय रिपब्लिकन काँग्रेस समितीच्या वार्षिक ‘स्प्रिंग डिनर’मध्ये […]

हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या गळाभेटीची जगभरात चर्चा झाली. आता याहून अधिक चर्चा होत आहे अमेरिकेची ओळख असलेल्या हार्ले डेविडसन बाईकवरील कर वाढीच्या मुद्द्याची. ट्रम्प यांनी भारताला जगातील सर्वाधिक कर लावणार देश म्हणत हा मूर्खपणाचा व्यापार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे विधान राष्ट्रीय रिपब्लिकन काँग्रेस समितीच्या वार्षिक ‘स्प्रिंग डिनर’मध्ये केले.

अमेरिकेची आर्थिक डबघाई दूर करण्यासाठी ट्रम्प अनेक नवे निर्णय घेत आहेत. यात जुन्या सरकारच्या निर्णयांना बदलण्यावर त्यांचा अधिक भर आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी युरोपियन युनियन आणि चीनवर वेळोवेळी टीका केली आहे. मात्र, भारताच्या कर धोरणानंतर ट्रम्प यांनी भारतालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

(भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची गळाभेटी)

‘भारत कर कमी करुन आमच्यावर उपकार करत नाही’

ट्रम्प यांना भारताकडून मोठ्या कर कपातीची अपेक्षा आहे. मात्र भारताने करात तेवढा मोठा दिलासा न दिल्याने ट्रम्प यांनी मोदींसोबत झालेल्या आपल्या खासगी चर्चेलाच सार्वजनिक केले आहे. मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना फोन करुन भारत सरकार हार्ले डेविडसनवर लावण्यात येणारा कर 50 टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याचे सांगितले होते. याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी भारत कर कमी करुन आमच्यावर उपकार करत नसल्याचे म्हटले. अमेरिकेला सध्या व्यापारात 800 बिलियन डॉलरचा तोटा होत आहे. यामागे इतर देशांमधून आयातीचा वाटा मोठा आहे. यात चीनचा वाटा मोठा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी अमेरिकेला आपली निर्यात वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळेच ट्रम्प युरोपियन युनियन, चीनसह आता भारतालाही लक्ष्य करत आहेत.

काय आहे ट्रम्प यांचं म्हणणं?

बाईक खरेदी विक्रीबाबत आपण भारताच्या बाईकवर जास्त कर लावत नाही. मात्र, भारत अमेरिकन बाईकवर 100 टक्क्यांपर्यंत कर लावत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. भारताच्या करवाढीमुळे हार्ले डेविडसनच्या किमती वाढत आहे आणि त्यामुळेच या बाईकच्या विक्रीत घट होत आहे. याला ट्रम्प यांनी विषम वागणूक म्हटले आहे. खरं म्हणजे या बाईकवर कर लावणारा भारत हा काही एकमेव देश नाही. चीन याच बाईकवर 30 टक्के आणि थायलंड 60 टक्के आयात कर लावतो.

भारताने 2018 च्या अर्थसंकल्पात उदारता दाखवत विदेशातून तयार होऊन येणाऱ्या 800 सीसी इंजन क्षमतेवरील बाईकवर कस्टम ड्युटी 75% वरुन 50% केली. 800 सीसीपेक्षा कमी इंजन बाईकवर 60% कस्टम ड्युटी लावली जात होती. मोदी यांनी ट्रम्प यांना जी कर कपात सांगितली होती ती 800 सीसी इंजन क्षमतेच्या वरील बाईकबाबत होती. कारण हार्ले डेविडसनच्या सर्वाधिक बाईक त्याच श्रेणीत येतात.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.