PPF, SCSS, KVP अन् NSC…,खाती होऊ शकतात फ्रीज, टपाल विभागाचा नवा आदेश काय?
post office schemes: टपाल विभाग खाते फ्रीज करण्याची ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवणार येणार आहे. दरवर्षी १ जुलै आणि १ जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरु होऊन १५ दिवसांच्या आता पूर्ण करण्यात येणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विविध बचत योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, वरिष्ठ नागरिक गुंतवणूक योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (KVP) किंवा राष्ट्रीय बचत योजनेत (NSC) खाती उघडली असतील तर फ्रीज होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टपाल विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. टपाल विभागाने म्हटले आहे की, बचत योजनेअंतर्गत ज्यांची खाती मुदतपूर्ती तारखेपासून तीन वर्षांनंतरही वाढवली गेली नाही, ती खाती गोठवण्यात येणार आहे.
वर्षातून दोन वेळा प्रक्रिया
टपाल खात्याने खाती फ्रीज करण्याबाबत नियमित प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा करण्यात येणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या सुरक्षित खात्यांची ओळख करता येणार आहे. आदेशात पुढे म्हटले आहे की, लघु बचत योजनेतील गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की जर ते मुदतपूर्तीच्या ३ वर्षांच्या आत त्यांनी खाते बंद केले नाहीत तर त्यांची खाती गोठवली जातील.
आदेशात म्हटले आहे की, स्माल सेव्हींग स्कीममध्ये मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), किसान विकास पत्र (केव्हीपी), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), आवर्ती ठेव (आरडी) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाती समाविष्ट आहेत.
खाते फ्रीज झाल्यावर काय होणार?
मुदतपूर्तीनंतर खाते फ्रीज झाले तर त्यातून खातेदार कोणताही व्यवहार करु शकणार नाही. खात्यातून पैसे काढता येणार नाही किंवा खात्यात पैसेही भरता येणार नाही. ऑलनाइन सेवांचा वापर करता येणार नाही. म्हणजेच तुम्ही पैशांचे कोणतेही व्यवहार करु शकणार नाही.
खाते फ्रीज करण्याची ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवण्यात येणार आहे. दरवर्षी १ जुलै आणि १ जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरु होऊन १५ दिवसांच्या आता पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजेच ३० जून आणि ३१ डिसेंबर रोजी मुदतीनंतर तीन वर्ष सुरु असणाऱ्या खात्यांची ओळख करण्यात येणार आहे. त्यानंतर ती खाती फ्रीज करण्यात येणार आहेत.
