AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI वर कोणाला किती पैसे पाठवले, नाही माहिती पडणार, एका क्लिकवर हिस्ट्री डिलीट होणार

how to delete transaction history in UPI Apps : युपीआय पेमेंटवरून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत व्यवहार सुरळीत झाले आहे. अनेकजणांना कुणाला किती पैसे पाठवले तो व्यवहार लपवून ठेवायचा असतो. एका क्लिकवर व्यवहारांचा तपशील असा नष्ट करा.

UPI वर कोणाला किती पैसे पाठवले, नाही माहिती पडणार, एका क्लिकवर हिस्ट्री डिलीट होणार
युपीआय व्यवहाराचा तपशील मिटवा
| Updated on: Sep 07, 2025 | 2:57 PM
Share

how to delete transaction history in Paytm : युपीआय पेमेंट हा आता दिवसभरातील व्यवहारांचा दूत झाला आहे. रोखीच्या व्यवहारसोबतच चहाचे बिल देण्यापासून ते लॅपटॉप खरेदीपर्यंत अनेक व्यवहार युपीआय पेमेंटद्वारे सहजरित्या करण्यात येतात. पीआय पेमेंटवरून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत व्यवहार सुरळीत झाले आहे. अनेकजणांना कुणाला किती पैसे पाठवले तो व्यवहार लपवून ठेवायचा असतो. एका क्लिकवर व्यवहारांचा तपशील असा नष्ट करा.

गुगलपे,फोनपे,पेटीएमचा व्यवहार तपशील हटवा

ऑनलाईन शॉपिंग असो वा एखाद्याला पैसे पाठवायचे असेल अगदी काही सेकंदात हे व्यवहार युपीआय पेमेंटद्वारे होतात. लोक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. फोनपे, गुगल पे असो वा पेटीएम आणि इतर अनेक युपीआय पेमेंट ॲप्सचा वापर केला जातो. पण कुणाला किती पैसे पाठवले हे कुणाला माहिती पडू नये असे मत असेल तर पेटीएम ट्रन्झॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याची सुविधा देते. पण डाटा कायमचा डिलीट होत नाही. कारण RBI च्या नियमानुसार, हा रेकॉर्ड जतन करून ठेवण्यात येतो. पण तो तुमच्या ॲपच्या ट्रन्झॅक्शन हिस्ट्रीतून नष्ट होतो.

फोनपे आणि गुगल पेमध्ये मात्र असा थेट कोणताही पर्याय नाही. गुगल पेमध्ये तुम्हाला एक पळवाट आहे. गुगल माय अ‍ॅक्टिव्हिटीवर जाऊन व्यवहार हटवता येतो. पेटीएम आणि गुगल पेमधून व्यवहार तपशील हटवण्यासाठी या पायऱ्यांचा वापर करा.

असा हटवा व्यवहारांचा तपशील

  1. पेटीएमवरून केलेले कोणतेही डिजिटल व्यवहार हटवायचे असतील तर सर्वात अगोदर पेटीएम ॲप उघडा.
  2. आता होम पेजवर मनी ट्रान्सफर विभागात बॅलन्स आणि हिस्ट्री हे दोन पर्याय दिसतील.
  3. या दोन पर्यायांवर क्लिक करा. आता व्यवहाराचा तपशील तुमच्यासमोर येईल.
  4. यातील जे व्यवहार तुम्हाला हटवायचे अथवा लपवायचे आहे, तो डावीकडे स्वाईप करा
  5. आता लपवा हा पर्याय समोर येईल. त्यावर क्लिक करा.
  6. या कृतीसाठी तुम्हाला पुष्टी (Confirmation) द्यावी लागेल.
  7. तो व्यवहार ट्रन्झॅक्शन हिस्ट्रीतून गायब होईल.

कोणी तुमच्या व्यवहाराचा तपशील तपासला तर, त्याला तो व्यवहार दिसणार नाही.

गुगल पेमधून कसा हटवणार व्यवहार तपशील? 

  • Phonepe and Google pay ॲप्समध्ये ट्रन्झॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याचा थेट पर्याय नाही. त्यासाठी एक पळवाट आहे. गुगल माय ॲक्टिव्हिटी पेजवर जाऊन व्यवहार तपशील हटवता येईल.
  • त्यासाठी अगदोर गुगल पे हे ॲप उघडा आणि नंतर उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
  • आता तुमच्या ॲप सेटिंग्जमध्ये जा. नंतर privacy and Setting या पर्यायावर क्लिक करा.
  • Data and Personalization वर क्लिक करा. आता गुगल अकाऊंट या पर्यायार क्लिक करा.
  • गुगल माय ॲक्टिव्हिटी पेजवर आल्यावर खाली जा.
  • येथे जो व्यवहार हटवायचा आहे, त्याच्या समोरील X चिन्हावर क्लिक करा.
  • डिलीट या पर्यायावर क्लिक करा. व्यवहाराचा तपशील दिसणार नाही.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.