AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vodafone Idea ने गुंतवणुकदारांना केलं कंगाल, 4 दिवसांत बुडाले 10 हजार कोटी, शेअर्स 45% घसरले

वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. त्यामुळे कंपनी बंद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Vodafone Idea ने गुंतवणुकदारांना केलं कंगाल, 4 दिवसांत बुडाले 10 हजार कोटी, शेअर्स 45% घसरले
व्हीआयने भारतात सुरू केले दोन उत्तम रिचार्ज प्लान
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 3:45 PM
Share

वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) टेलिकॉम कंपनी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये  (Share Market) सातत्यानं घसरण होत आहे. कंपनीच्या शेअसर्चे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत आहेत. आतापर्यंत वोडाफोन आयडियाच्या शेअर्स 45 टक्क्यांनी पडलेत. मागच्या फक्त चारच दिवसांत कंपनीच्या गुंतवणुकदारांचे तब्बल 10 हजार 926 कोटी रुपये बुडाले आहेत. (Vodafone Idea shares fall 45 percent 10 thousand 926 crore loss to investors)

वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. त्यामुळे कंपनी बंद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यात कुमार मंगलम बिर्ला (Kumar Manglam Birla) यांनी कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. बिर्ला यांच्या राजीनाम्यानंतर गुरूवारी (5 ऑगस्ट) वोडाफोन आयडियाचा शेअर 24.54 टक्क्यांनी कोसळून 52 आठवड्यातल्या निचांकी 4.55 रुपयांवर गेला. कंपनीच्या शेअर्सचे भाव सातत्यानं कोसळत असल्यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागत आहे.

31 ऑगस्ट 2018 ला वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं होतं. तेव्हापासून सातत्यानं ही कंपनी तोट्या तआहे. निधी जमवण्यात कंपनीचे प्रयत्न असफल होत आहेत. बिर्ला यांनी कर्जात बुडालेल्या कंपनीला बाहेर काढण्यासाठी सरकारी पॅकेजची मागणी केली होती.

4 दिवसांत 45 टक्क्यांनी कोसळला शेअर

वोडाफोन आयडियाचे शेअर्स सातत्यानं कोसळत आहेत. मागच्या फक्त चार दिवसांत कंपनीचे शेअर्स तब्बल 45 टक्क्यांनी घसरले आहेत. 2 ऑगस्टला कंपनीचा शेअर 8.25 रुपयांवर होता. तो गुरूवारी 24.45 टक्क्यांनी घसरून 4.55 रुपयांवर निचांकी स्तरावर गेला. या सगळ्यात गुंतवणुकदारांचे मात्र, 10 हजार 296 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांचं केंद्र सरकारला पत्र

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला पत्र लिहलं होतं. त्यात त्यांनी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या Vodafone-Idea लिमिटेड कंपनीतील आपला हिस्सा सरकार किंवा अन्य कंपनीला विकण्याची तयारी दर्शविली होती. कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली होती.

50 हजार कोटींचं कर्ज

Vodafone-Idea लिमिटेडच्या डोक्यावर 58,254 कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी 7,854.37 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने फेडले होते. मात्र, अजूनही कंपनीच्या डोक्यावर 50,399.63 कोटींचे कर्ज आहे. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने Vodafone-Idea लिमिटेडला परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी दिली होती. मात्र, सरकारी धोरणामुळे कोणीही कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार नाही, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी पत्रात म्हटले होते. (Vodafone Idea shares fall 45 percent 10 thousand 926 crore loss to investors)

संबंधित बातम्या :

कुमारमंगलम बिर्लांच्या ‘त्या’ पत्रामुळे व्होडाफोन-आयडियाच्या समभागाच्या किंमतीत घसरण

नागरिकांच्या पैशासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, बचत आणि एफडी खात्यांवर ही मोठी सुविधा उपलब्ध

‘वर्क फ्रॉम होम’पासून IT सेवांना मजबूत बूस्ट; यंदा कंपन्यांची बंपर कमाई, भरपूर फायदा होणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.