AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voter ID | मतदार यादीत आले की नाही नाव? असे तयार करा मतदान कार्ड

National Voters’ Day | लोकसभा निवडणुकीत यावर्षात लाखो नवीन मतदार सहभागी होणार आहेत. ते पहिल्यांदा त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. ज्या तरुणांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, ते मतदान कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करु शकतात. आज मतदाता दिवस आहे. मतदान कार्डसाठी अशी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Voter ID | मतदार यादीत आले की नाही नाव? असे तयार करा मतदान कार्ड
| Updated on: Jan 25, 2024 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली | 25 January 2024 : लोकसभा निवडणूक 2024 आता एकदम तोंडावर आली आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. यावर्षातील निवडणुकीत 50 लाखांहून अधिक नवीन मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येकाने मतदानाचा वापर करुन त्यांचा लोकसभेचा प्रतिनिधी संसदेत पाठवावा.  आज राष्ट्रीय  मतदार दिवस (National Voters’ Day) आहे. जर तुम्ही वोटर आयडी कार्ड तयार केले नसेल तर ते लवकर तयार करुन घ्या. या सोप्या पद्धतीने तुम्हाला मतदार होता येईल. मतदान करण्यासाठी मतदार कार्ड आवश्यक आहे. मतदान कार्ड तयार करणे सोपे आहे. त्यासाठी अर्ज करता येईल, अशी सोपी आहे प्रक्रिया, जाणून घ्या..

कसा कराल मतदार आयडी कार्डसाठी अर्ज?

  • सर्वात अगोदर भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
  • त्यानंतर मतदार सेवा पोर्टल (NVSP) वर क्लिक करा
  • नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
  • आता जन्मतारीख, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राची सविस्तर माहिती जमा करा
  • सबमिट बटणावर क्लिक करा

अर्ज केल्यानंतर काय कराल

मतदार कार्डासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर एक ईमेल येईल. या ई-मेल मध्ये एक लिंक असेल. त्याआधारे उमेदवाराला वोटर आयडी कार्ड तयार करण्यासाठी त्याचे स्टेट्स चेक करता येईल. एका महिन्याच्या आता त्याचे मतदार कार्ड तयार होईल.

मतदार कार्ड नाही मिळाले तर ?

अर्ज केल्यानंतर निवडणूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून फोन न आल्यास मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मतदार कार्डचे स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी तुम्ही ज्या राज्याचे रहिवाशी आहात, तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, ते तपासा. जर तुमचे यादीत नाव असेल तर मतदार कार्ड तयार होण्यास वेळ लागणार नाही.

काय लागतील कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट, वाहन परवाना
  • पॅनकार्ड, इयत्ता दहावी, बारावीची गुणपत्रिका

मतदार कार्ड-आधार कार्ड लिंक

ज्या नागरिकांचे मतदार कार्ड आधार कार्ड आधारे तयार झालेले नाही. त्यांना आधार कार्ड आणि मतदार कार्ड यांची जोडणी करणे गरजेचे आहे. मतदानातील गडबडी आणि बोगस मतदार शोधण्यासाठी अथवा तुमच्या नावावर बनावट, डुप्लिकेट मतदान कार्ड असेल तर समोर येण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मतदार कार्ड, आधार कार्डशी लिंक करता येते. त्यासाठी NVSP च्या पोर्टलवर जावे लागेल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.