AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unclaimed Money : या हजार कोटी रुपयांचे मालक तरी कोण? वारसच सापडेना, आता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

Unclaimed Money : भारतीय बँकांमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. पण त्यावर दावा सांगणारे मालक गायब आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय

Unclaimed Money : या हजार कोटी रुपयांचे मालक तरी कोण? वारसच सापडेना, आता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय
| Updated on: Apr 06, 2023 | 4:36 PM
Share

नवी दिल्ली : गुरुवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor ShaktiKant Das) यांनी रेपो दरात घसरणीची गुडन्यूज दिली. गेल्या वर्षभरात रेपो दरात पहिल्यांदा कोणताही बदल करण्यात आला नाही. रेपो दरात कोणतीही वाढ न झाल्याने ईएमआयचा बोजा वाढणार नाही. पण आणखी एक गोष्ट समोर आली आहे. भारतीय बँकांमध्ये हजारो कोटी रुपये (Unclaimed Money) पडून आहेत. पण त्यावर दावा सांगणारे मालक गायब आहे. या रक्कमेवर दावा सांगणारे खरे मालक शोधून काढणं हे मोठे आव्हान आहे. त्यावर केंद्र सरकारने एक जालीम उपाय शोधला आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय

35,012 कोटी रुपये कोणाचे? तुमचे आजोबा, पणजोबा यांनी जर एखाद्या बँकेत खाते उघडले असेल, ज्याचा घरच्यांना थांगपत्ता नव्हता. तर आता त्यांच्यानंतर या खात्यावर आणि त्यावरील पैशांवर तुम्हाला हक्क सांगता येईल. त्यांनी योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर केले तर ही रक्कम त्यांना मिळू शकते. आरबीआय गव्हर्नर यांनी याविषयीची माहिती आज झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर दिली.

रक्कमेत मोठी वाढ भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचा पैसा पडून आहे. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली. काहींनी मुदत ठेव ठेवली. याविषयीची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली नाही. खातेदार जग सोडून गेल्यानंतर ही रक्कम तशीच पडून आहे. देशातील अनेक बँकांमध्ये जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.

दावा न झालेल्या रक्कमेबाबत निर्णय आता यापुढे ज्या खातेदारांनी खाते उघडले, मुदत ठेवमध्ये गुंतवणूक केली. त्यांची रक्कम पुढे अनक्लेम डिपॉझिटमध्ये जाऊ नये यासाठी केंद्रीय बँकेने पाऊल टाकले आहे. त्यासाठी एक प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धीमतेवर काम करेल. त्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या रक्कमेवर दावा सांगण्यात आलेला नाही, त्याविषयीची योग्य माहिती समोर येईल. तसेच सध्या जी हजारो कोट्यवधींची रक्कम पडून आहे, तिच्या वारसदारांचा शोध लावता येईल.

काय आहे Unclaimed Deposit तर दावा नसलेली ठेव, रक्कम काय असते आणि त्याविषयी काय होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एखाद्या व्यक्तीने खाते उघडल्यानंतर त्यात काही व्यवहार केला. त्यात काही रक्कम जमा केली. ठेव ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी या खात्याकडे त्यानं ढुंकूनही पाहिले नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार हे खाते अनक्लेम डिपॉझिट म्हणून ग्राह्य धरते. यातील रक्कमेवर कोणी दावा सांगितला आणि पुरावा दिला तर ही रक्कम त्या व्यक्तीला अथवा वारसदारांना मिळते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.