AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR-1 किंवा ITR-2…, पगारातून उत्पन्न असणाऱ्यांनी कोणता टॅक्स रिटर्न अर्ज भरावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

यंदा अर्थसंकल्प २०२४ मध्ये जाहीर केलेल्या बदलांचा समावेश आयकर रिटर्न फॉर्ममध्ये करण्यात आले आहे. तुम्ही पगारदार असाल तर आयटीआर १ आणि आयटीआर २ मध्ये कोणता फॉर्म भरावा, यासंदर्भात जाणून घ्या सर्व माहिती...

ITR-1 किंवा ITR-2..., पगारातून उत्पन्न असणाऱ्यांनी कोणता टॅक्स रिटर्न अर्ज भरावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
| Updated on: Jul 21, 2025 | 1:01 PM
Share

Income Tax Return Filling 2025: आयकर विभागाने आर्थिक वर्ष सन २०२४-२५ साठी इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी केले आहेत. यंदा अर्थसंकल्प २०२४ मध्ये जाहीर केलेल्या बदलांचा समावेश आयकर रिटर्न फॉर्ममध्ये करण्यात आले आहे. तुम्ही पगारदार असाल तर आयटीआर १ आणि आयटीआर २ मध्ये कोणता फॉर्म भरावा, यासंदर्भात तुम्हाला माहिती हवी. पगारदार व्यक्तींसाठी हे दोन फॉर्म असतात.

आयटीआर-1 चा नियमात बदल

आयकर विभागाने जे करदाते आयटीआर-१ चा वापर करतात त्यांच्यासाठी नियमात बदल केला आहे. या बदलामुळे अनेक करदात्यांना आपले आयटीआर फाईल करणे सोपे होणार आहे. यापूर्वी ज्या करदात्यांना कॅपिटल गेन मिळत होता, ते आयटीआर १ फॉर्मचा वापर करु शकत नव्हते. नवीन फॉर्मनुसार व्यक्तीगत करदाते आयटीआर १ चा वापर करुन आपले इनकम टॅक्स रिटर्न दाखल करु शकणार आहेत. फक्त त्यासाठी काही अटी आहेत. त्यांना झालेला फायदा हा लिस्टेड इक्विटी शेअर किंवा इक्विटी म्यूचुअल फंड यूनिट्समधून झालेला हवा. तसेच हा लाभ संपूर्ण आर्थिक वर्षात १.२५ लाखांपेक्षा जास्त असू नये.

आयटीआर-1 फॉर्म कोणासाठी?

कोणताही पगारदार व्यक्ती आयटीआर १ भरण्यासाठी पात्र आहे. त्याने खालील दिलेल्या अटीपैंकी कोणतीही एक अट पूर्ण करायला हवी.

  • व्यक्ती दीर्घकाळापासून भारतात राहत असला पाहिजे.
  • सन २०२४-२५ मध्ये त्याचे करपात्र उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असू नये.
  • उत्पन्नाचे सोर्स पगार, घर संपत्ती, व्याज, लाभांश, पेन्शन, लिस्टेड इक्विटी शेअर, म्यूचुअल फंड युनिट्समधून १.२५ लाख रुपयांपर्यंत लॉन्ग टर्म कॅपिटल गेन असावे.

आयटीआर-2 फॉर्म कोणासाठी?

जे करदाते आयटीआर १ वापरु शकत नाही आणि खालील अटींपैकी कमीत कमी एक अट पूर्ण करत असतील त्यांच्यासाठी आयटीआर २ फॉर्म आहे.

  • करदाता भारताचा रहिवाशी किंवा अनिवासी भारतीय असला पाहिजे.
  • हिंदू अविभाजित परिवार (HUF) चा असावा. HUF म्हणजे ते एक परिवार सोबत राहत असतील आणि त्यांचा व्यवसाय एकत्र असेल.
  • सन २०२४-२५ करपात्र उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवे.
  • करदाता कोणत्यातरी कंपनीचा संचालक असावा.
  • करदात्याकडे अनलिस्टेड इक्विटी शेअर असावे. अनलिस्टेड इक्विटी शेअर स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड नसतात.
  • करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असावे. जसे व्याज, डिव्हिडेंड, भाडे, कॅपिटल गेन किंवा विदेशातील संपत्ती.
  • व्हर्चुअल डिजिटल एसेट्स म्हणजे क्रिप्टोकरेंसी, NFT मधून त्याला उत्पन्न मिळालेले असावे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.