रतन टाटा जगातील सर्वात श्रीमंतांच्या शर्यतीत का नसतात, जाणून घ्या कारण

रतन टाटा यांचे नाव भारतातच नाही तर जगभरात मोठ्या आदराने घेतले जाते. रतन टाटा यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेत खुप मोठा वाटा आहे. भारतीय लोकांमध्ये देखील टाटांबद्दल नेहमीच आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी उद्योग असले तरी ते श्रीमंतांच्या यादीत का दिसत नाहीत जाणून घ्या.

रतन टाटा जगातील सर्वात श्रीमंतांच्या शर्यतीत का नसतात, जाणून घ्या कारण
टाटांनी जिंकली पुन्हा मने
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 8:13 PM

रतन टाटा यांचं नाव देशातील प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये येतं. पण रतन टाटा यांच्याबद्दल असलेला भारतीय लोकांच्या मनातील सन्मान इतर उद्योगपतींना मिळत नाही. फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव नसते. अनेकांना प्रश्न पडतो की, इतका मोठा व्यवसाय असून देखील सुद्धा त्यांचं जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत नाव का नसते. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात नेहमीच शर्यत दिसते. पण रतन टाटा या शर्यतीत का दिसत नाहीत. चला आज जाणून घेऊयात.

सर्वात यशस्वी उद्योजक

रतन टाटा यांना मिळणारा आदर आणि प्रशंसा ते भारतासाठी किती महत्त्वाचे आहेत हे दर्शवते. ते आता टाटा समूहाचे प्रमुख आहेत. त्यांनी आपल्या विलक्षण नेतृत्व क्षमता आणि व्यावसायिक कौशल्याने समूहाला मोठ्या नवीन उंचीवर नेले आहे. टाटा समूहामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे की, IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. रतन टाटा यांची संपत्ती 3,800 कोटी रुपये आहे. या सह ते श्रीमंताच्या यादीत 421 व्या क्रमांकावर आहेत. पण त्यांचा प्रभाव या या पेक्षा किती तरी उंचीवर दिसतो.

श्रीमंतांच्या यादीत टाटा का दिसत नाहीत?

रतन टाटा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत न येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे समाजसेवेप्रती असलेले त्यांचे समर्पण. टाटा समूहाची मुख्य गुंतवणूक होल्डिंग कंपनी टाटा सन्स आहे. या कंपनीचा सर्वाधिक नफा हा टाटा ट्रस्टला जातो. या ट्रस्टचा उपयोग विविध धर्मादाय कामांसाठी केला जातो. ज्यामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक संवर्धन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात. रतन टाटा यांच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग वैयक्तिक लाभाऐवजी या सेवाभावी गोष्टींमध्ये जास्त असतो. यामुळेच ते श्रीमंतांच्या क्रमवारीत नसतात. ते श्रीमंताच्या शर्यतीत नाहीत आणि त्यांना देखील याचा नक्कीच काही फरक देखील पडत नसेल. श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करताना ते कधीच दिसत नाहीत.

सामाजिक मूल्यांना महत्त्व

टाटा कुटुंब नेहमीच सामाजिक मुल्यांना महत्त्व देत आले आहेत. त्यांचे योगदान हे सामाजिक मूल्यांसाठी आहे. टाटा समूह हा औदार्य आणि सामाजिक जाणीव असलेल्या नेतृत्वाच्या चिरस्थायी परिणामांचा पुरावा आहे. त्यांच्या प्रभावी देणगी संस्कृतीमुळे टाटा समूह कॉर्पोरेट परोपकाराच्या क्षेत्रात एक नेता म्हणून उदयास आला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.