1 ग्रॅममध्ये खरेदी करा 200 किलो सोने; का इतका महाग आहे हा धातू? केवळ या खास कामासाठीच होतो वापर
World Most precious Metal : सोनं महाग झाल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. पण जगात सोने हा धातूच सर्वात महाग आहे, असं नाही तर जगात अजून एक धातू सर्वात महाग आहे. त्याच्या एक ग्रॅममध्ये 200 किलो तुम्ही खरेदी करू शकता. कोणता आहे तो धातू?

World Most Expensive Metal : उपयोग आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हा सर्वात बेशकिंमती धातू मानल्या जातो. पण किंमतीच्या हिशोबाने जगातील सर्वात महागडा धातू हा वेगळाच आहे. या बेशकिंमती धातूचे नाव कॅलिफोर्नियम (Californium) असे आहे. एक ग्रॅम कॅलिफोर्नियम विक्री केली तर त्यातून 200 किलो सोने खरेदी करता येते. हे एकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट अगदी खरी आहे. पण हा धातू इतका महाग का आहे, त्याचा कुठे इतका वापर होतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काय आहे त्याचे उत्तर? चला तर जाणून घेऊयात.
काय आहे कॅलिफोर्नियम?
Californium एक कृत्रिम रेडिओॲक्टिव्ह केमिकल एलिमेंट आहे. खासकरुन कृत्रिमरित्या तयार होणार हे तत्व असल्याने कॅलिफोर्नियम अत्यंत दुर्मिळ आणि महागडे आहे. त्याची सर्वाधिक किंमत ही त्याच्या कृत्रिम स्वरुपामुळे, दुर्मिळतेमुळे आणि अणुभट्यांमध्ये ते तयार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या जटिल प्रक्रियेमुळे वाढली आहे.
1 ग्रॅम कॅलिफोर्नियमचा भाव
एक ग्रॅम कॅलिफोर्नियम धातूची किंमत 27 दशलक्ष डॉलर म्हणजे 239 कोटी रुपये आहे. तर सोन्याचा भाव 1.2 कोटी रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. एक ग्रॅम कॅलिफोर्नियमधून ग्राहकाला 200 किलो सोने खरेदी करता येईल. कॅलिफोर्नियम एक रेडिओॲक्टिव्ह रासायनिक घटक आहे. त्याचे प्रतिक Cf आहे. हा धातू 1950 मध्ये कॅलिफॉर्निआ विद्यापीठात बर्कलेच्या संशोधकांनी शोधले होते. त्यामुळे या धातूला या विद्यापीठाचे नाव देण्यात आले.
कॅलिफोर्नियम हे पृथ्वीवर नैसर्गिक रुपात उपलब्ध नाही. हे पूर्णपणे कृत्रिम तत्व आहे. त्याची निर्मिती आणि उत्पादन अत्यंत किचकट आहे. दुर्मिळ असल्यानेच त्याची किंमत 27 दशलक्ष डॉलर म्हणजे 239 कोटी रुपये इतकी आहे. जगभरात बोटावर मोजण्यात इतकेच त्याचे पुरवठादार आहेत. न्युक्लिअर रिएक्टर्समध्येच त्याचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. हा धातू सर्वसामान्यांना दिसणे अवघड आहे. कारण त्याचा वापर अणुप्रकल्पात आणि अणू ऊर्जासंबंधी प्रकल्पांमध्येच अधिक होतो. तो पूर्णपणे कृत्रिम आहे. त्याचा सर्वसामान्य गोष्टींसाठी उपयोग होत नाही.
