AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिटायर झाल्यावर आनंदात जगायचंय, मग NPS योजनेत गुंतवणूक करा

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात व्यक्ती पैसे कमावण्यास सक्षम नसल्यामुळे याच साठवलेल्या पैशांवर त्याला गुजराण करावी लागते. | NPS retirement fund

रिटायर झाल्यावर आनंदात जगायचंय, मग NPS योजनेत गुंतवणूक करा
money
| Updated on: Jan 26, 2021 | 8:32 PM
Share

मुंबई: हल्लीच्या काळात नोकरीवरुन निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यातील खर्चासाठी पैशांचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक बाब झाली आहे. त्यासाठी पुढील गोष्टींचा अंदाज घेऊन प्लॅन आखण्याची गरज असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बचत आणि रिटायरमेंट स्टेज असे दोन भाग असतात. ( How to invest for after retirement life)

यापैकी पहिल्या भागात व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर पैशांची बचत करतो. तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यात व्यक्ती पैसे कमावण्यास सक्षम नसल्यामुळे याच साठवलेल्या पैशांवर त्याला गुजराण करावी लागते.

अलीकडच्या काळात रिटायरमेंड फंडासाठी NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना हा पर्याय चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. 18 ते 60 वयोगटातील लोक NPS मध्ये गुंतवणूक करु शकतात. देशातील सरकारी आणि खासगी बँकांमधून तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करु शकतात.

NPS कशाप्रकारे काम करते?

NPS ही योजना एखाद्या म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करते. NPS योजनेत इक्विटी, कॉर्पोरेट बाँड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अशा तीन प्रकारांमध्ये गुंतवणूक होते. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी NPS योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम या योजनेत गुंतवू शकता. निवृत्तीनंतर तुम्ही जमा झालेल्या पैशांपैकी काही हिस्सा काढून घेऊ शकता. त्यानंतर नियमित उत्पन्नासाठी उर्वरित रक्कमेचा वापर करु शकता.

मुदतीपूर्वीच पैसे काढण्याची सोय

NPS योजनेत गुंतवलेले पैसे तुम्ही गरज पडल्यास मुदतीपूर्वीच काढू शकता. नवीन व्यापार सुरु करणे, घर खरेदी, लग्न, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाच्या खर्चासाठी या योजनेतील पैसे काढण्याची मुभा आहे.

घरबसल्या उघडू शकता अकाऊंट

NPS योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही घरबसल्या खाते उघडू शकता. इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून तुम्हाला NPS खाते उघडता येईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल फोनवर ओटीपी मिळेल.

आयकरात सूट

NPS योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 80 सी अंतर्गत आयकरात सूट मिळते.

फ्लेक्सिबल गुंतवणूक

NPS योजनेत तुम्हाला ऐच्छिक योगदानाची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहक वर्षात कोणत्याही वेळी आपले पैसे जमा करु शकतात. तसेच गुंतवणुकीची रक्कम कमी जास्त झाल्यासही फरक पडत नाही. तसेच तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यास तिथूनही आपले NPS खाते हाताळू शकता.

संबंधित बातम्या:

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

‘दिल टूटा आशिक’ नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

( How to invest for after retirement life)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....