AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंजिनिअरिंग , डॉक्टर नाही,तरीही लाखोंची कमाई शक्य आहे! जाणून घ्या करिअर ६ पर्याय

आजच्या जगात यशस्वी आणि मालामाल होण्यासाठी करिअरचे मार्ग विविध आहेत! काही भन्नाट आणि वेगळे करिअर पर्याय आहेत, जिथे तुम्ही तुमच्या आवडीचं काम करून लाखोंची कमाई करू शकता!

इंजिनिअरिंग , डॉक्टर नाही,तरीही लाखोंची कमाई शक्य आहे! जाणून घ्या करिअर ६ पर्याय
| Edited By: | Updated on: Jun 03, 2025 | 3:44 PM
Share

“मोठा होऊन काय बनणार?” या प्रश्नाचं उत्तर अनेकदा ‘इंजिनिअर’ किंवा ‘डॉक्टर’ असंच मिळतं. समाजात या दोन क्षेत्रांना खूप प्रतिष्ठा आणि चांगल्या पगाराची हमी मानली जाते. पण खरंच फक्त हेच दोन मार्ग आहेत का यशस्वी करिअरसाठी? आजचं जग खूप बदललं आहे आणि अनेक नवीन, अनपेक्षित क्षेत्रं निर्माण झाली आहेत, जिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम करून लाखोंची कमाई करू शकता! जर तुम्हाला पारंपरिक मार्गांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल, तर हे ६ करिअर पर्याय तुमच्यासाठी नक्कीच विचार करण्यासारखे आहेत.

1. Marketing Manager:

आज कोणतीही वस्तू किंवा सेवा विकायची असेल, तर प्रभावी मार्केटिंग गरजेची आहे. मार्केटिंग मॅनेजरचं काम उत्पादनाला लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याची ओळख निर्माण करणं आणि विक्री वाढवण्यासाठी नवनवीन कल्पना लढवणं हे असतं. जर तुमच्याकडे Communication Skills आणि Creative Thinking असेल, तर मार्केटिंग किंवा कम्युनिकेशनमधील पदवी घेऊन तुम्ही या क्षेत्रात उतरू शकता. इथे अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर वार्षिक ५ लाखांपासून ते २६ लाखांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त पगार मिळतो.

2. Product Manager:

एखादं नवीन उत्पादन किंवा ॲप बाजारात येण्यापूर्वी त्यामागची संपूर्ण प्रक्रिया प्रोडक्ट मॅनेजर सांभाळतो. त्याला बाजाराची जाण आणि ग्राहकांच्या गरजा ओळखता यायला हव्यात. कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस किंवा मार्केटिंगमधील पदवी यासाठी उपयुक्त ठरते. या कामात वार्षिक ६ लाख ते ४० लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

3. Investment Banker:

मोठ्या कंपन्यांना किंवा सरकारला जेव्हा पैसे उभे करायचे असतात, तेव्हा इन्व्हेस्टमेंट बँकर्स त्यांची मदत करतात. हे लोक शेअर मार्केट, कंपन्यांचे विलीनीकरण आणि मोठ्या गुंतवणुकीचे व्यवहार सांभाळतात. अर्थशास्त्र, फायनान्स किंवा कॉमर्समधील पदवी घेतलेले तरुण या क्षेत्रात येऊ शकतात. इथे अनुभव आणि कामाच्या स्वरूपानुसार वार्षिक ३ लाख ते अगदी ४५ लाखांपर्यंतही पगार असतो.

4. Chartered Accountant (CA):

प्रत्येक कंपनीला आपले आर्थिक व्यवहार आणि टॅक्स यांचं योग्य नियोजन करावं लागतं. हे किचकट काम Chartered Accountant म्हणजेच CA करतात. Auditing, Tax Consultancy आणि Financial Planning हे त्यांचं मुख्य काम. यासाठी १२ वी नंतर कॉमर्स किंवा फायनान्समध्ये पदवी आणि मग CA चा कठीण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. सुरुवातीलाच वार्षिक ३ लाखांपासून ते २० लाखांपर्यंत पगार मिळू शकतो, जो अनुभवाने खूप वाढतो.

5. Commercial Pilot:

जर तुम्हाला प्रवास आणि साहसाची आवड असेल, तर कमर्शिअल पायलट बनणं हा एक स्वप्नवत पर्याय आहे! प्रवाशांना किंवा मालाला सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची असते. यासाठी १२ वी मध्ये फिजिक्स आणि गणित हे विषय, आणि त्यानंतर कमर्शिअल पायलटचं खास प्रशिक्षण घ्यावं लागतं. या क्षेत्रात पगार खूप आकर्षक असतो, वार्षिक ८५ लाखांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त!

6. Management Consultant:

अनेक कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन योजना आखण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी बाहेरच्या तज्ज्ञांची गरज लागते. मॅनेजमेंट कन्सल्टंट हेच काम करतात. ते कंपनीच्या कामाचं विश्लेषण करून त्यांना योग्य सल्ला देतात. यासाठी MBA ही पदवी खूपच फायदेशीर ठरते. इथे वार्षिक १० लाखांपासून ते ४५ लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.