FD प्री-मॅच्युअर काढल्यास किती दंड भरावा लागतो? नियम जाणून घ्या
FD गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बँका प्री-मॅच्युअर FD काढण्यावर दंड आकारतात. अशा परिस्थितीत तोट्याला सामोरे जावे लागू शकते. मुदतपूर्व FD काढण्यावरील दंड काही अटींच्या आधारेच माफ केला जाऊ शकतो, जाणून घेऊया.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2025 सालच्या पहिल्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कपात करण्याची घोषणा केल्यापासून मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात कपात करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक FD गुंतवणूकदार व्यावसायिक बँकांनी FD च्या व्याजदरात सुधारणा करण्यापूर्वी त्यांच्या विद्यमान मुदत ठेव योजनेची मुदतपूर्व माघार घेण्याचा आणि सध्याच्या दराने दीर्घ मुदतीसाठी पुनर्गुंतवणुकीचा विचार करू शकतात.
मुदतपूर्व पैसे काढल्यास भरावा लागू शकतो दंड
FD गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बँका प्री-मॅच्युअर पैसे काढण्यावर दंड आकारतात. अशा परिस्थितीत त्यांना तोट्याला सामोरे जावे लागू शकते. मुदतपूर्व पैसे काढण्यावरील दंड काही अटींच्या आधारेच माफ केला जाऊ शकतो. जसे की दीर्घ मुदतीच्या IFF साठी पुन्हा त्याच बँकेत पुन्हा गुंतवणूक करणे. अशा परिस्थितीत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी गुंतवणूकदारांना आपल्या बँकेतून मुदतपूर्व पैसे काढल्यावर मिळणाऱ्या दंडाची रचना आणि व्याज याची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.
सर्व बँका मुदतपूर्व FD काढण्यावर वेगवेगळे दंड आकारतात. हा दंड सहसा 0.5% ते 1% दरम्यान असतो. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँकेच्या मुदतपूर्व पैसे काढण्यावरील दंडाबद्दल जाणून घेऊया.
SBI टर्म डिपॉझिट स्टेट बँक ऑफ इंडिया पाच लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींच्या प्रीपेमेंटवर 0.50 टक्के, तर 5 लाख रुपयांपेक्षा अधिक मुदत ठेवींवर 1 टक्के दंड आकारते. तर पंजाब नॅशनल बँक मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास FD वर 0.5 किंवा 1 टक्के कमी व्याज देईल.
HDFC बँकेचा दंड तर HDFC बँक मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास FD वरील व्याजदरापेक्षा 1 टक्के कमी व्याज देईल. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, 22 जुलै 2023 पासून स्वीप-इन आणि अंशत: पैसे काढण्यासह प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचा व्याजदर ठेवीच्या तारखेच्या दरापेक्षा 1% कमी (लागू दंडासह) असेल. जे करारदराऐवजी बँकेकडे ठेवीच्या कालावधीवर आधारित असेल.
प्री-मॅच्युअर पैसे काढण्यावर PNB चा दंड याशिवाय पंजाब नॅशनल बँक डोमेस्टिक एफडी मॅच्युरिटीपूर्वी काढता येते. किंवा अंशत: पैसे काढल्यास 1 टक्के दंड आकारतो. मात्र PNB ची एक एफडी तोडून पुन्हा त्याच बँकेत दुसरी FD उघडल्यास कोणताही दंड भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी तुम्हाला तुटलेल्या FD च्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
