दहावी आणि बारावीनंतर सैन्यात कोणकोणत्या पदांसाठी भरती होता येईल? वाचा सविस्तर

सैन्यात नेमकं कसं भरती व्हावं, सैन्याच्या कोणत्या दलात सहभागी व्हावं, त्यासाठी शिक्षण किती? असे प्रश्न अनेक तरुणांच्या मनात घर करुन राहतात (carrier in India army)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:45 PM, 16 Jan 2021
दहावी आणि बारावीनंतर सैन्यात कोणकोणत्या पदांसाठी भरती होता येईल? वाचा सविस्तर

मुंबई : सैनिक हे या देशातील सर्वात श्रेष्ठ, सन्मानाचं, महत्त्वाचं आणि जबाबदारीचं पद! कित्येक तरुणाचं सैनिक बनून देशाचं रक्षण करावं, असं स्वप्न असतं (carrier in India army). मात्र, सैन्यात नेमकं कसं भरती व्हावं, सैन्याच्या कोणत्या दलात सहभागी व्हावं, त्यासाठी शिक्षण किती? असे प्रश्न अनेक तरुणांच्या मनात घर करुन राहतात. अशाच तरुणांसाठी आज आम्ही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. देश सेवेसाठी इच्छूक असणारे तरुण 12 वी किंवा ग्रॅज्युएशननंतर सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करु शकतात. पण सैन्यदलात कोणकोणत्या पदासाठी अर्ज दाखल करता येतील, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

NDA किंवा NA

तुमचं जर विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण झालं असेल तर तुम्ही नॅशनल डिफेन्स अकादमी किंवा नौदल अकादमीत अर्ज करु शकता. ही परीक्षा यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून वर्षातून दोनवेळा घेतली जाते. त्यापैकी पहिली परीक्षा ही एप्रिल-मे महिन्यात होते. तर दुसरी परीक्षा आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येते. या परीक्षेत निवड होणाऱ्या उमेदवारांना नौदल, लष्कर आणि वायू दलात लेफ्टनंट बनवले जाते (carrier in India army).

IAFCAT Recruitment

अनेकांची वायू दलात काम करण्याची इच्छा असते. वायू दलाकडून कॉमन अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. या परीक्षेसाठी कला आणि विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. मात्र, या परीक्षेसाठी वयाची अट आहे. या परीक्षेसाठी 16 ते 19 वयोगटातील विद्यार्थीच अर्ज दाखल करु शकतात.

IAF Group X and Y Recruitment 2021

भारतीय वायूदलात X आणि Y पदाच्या भरती आयोजित केली जाते. 10 वी आणि 12 वी पास विद्यार्थी या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. यावर्षी 22 जानेवारीपासून या पदांसाठी भरती निघेल.

SSC GD Recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 12 वी पास उमेदवारांसाठी जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी भरती आयोजित केली जाते. या परीक्षेतून BSF, भारत-तिबेट सीमा पोलीस, सीआरपीएफ, आसाम रायफल्स, सीआयएसएफमध्ये जीडी कॉन्स्टेबल पदासाठी भरती केली जाते. या पदासाठीदेखील लवकरच नोटीफिकेशन जारी केलं जाणार आहे.

Indian Army Recruitment Rally

सैन्यदलात भरतीसाठी देशभरात विविध राज्यांमध्ये रॅली आयोजित केली जाते. या रॅली अंतर्गत भारतीय सैन्यात सैनिक पदावर भरती केली जाते. या पदासाठी इच्छूक उमेदवाराचे वय 16 ते 21 वर्ष असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएशननंतर भरतीसाठी कसा अर्ज दाखल करायचा?

CDS : पदवी प्राप्त केल्यानंतर तुमची सैन्यदलात करियर करायची इच्छा असेल तर तुम्हाला या पदासाठी उत्तम संधी आहे. सीडीएस पदासाठी उमेदवाराला प्रिलियम्स परीक्षा, त्यानंतर मेंस, फिजिकल आणि मेडिकल टेस्ट, जीडी आणि डॉक्यूमेंट्री वेरिफिकेशन या सर्वांना सामोरं जावं लागतं. सर्वच परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यास उमेदवाराला या पदाची नोकरी मिळते. या पदासाठी 19 तो 25 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. या व्यतिकरिक्तही अनेक पदांसाठी उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.