ICSI CS Foundation Exam 2021 : सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर, येथे जाणून घ्या तपशील

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS निकाल 2021 तारीख (ICSI CS June Result 2021 Date) जाहीर केली आहे. व्यावसायिक, कार्यकारी आणि फाउंडेशन प्रोग्रामचा निकाल 13 ऑक्टोबर 2021 रोजी एकाच वेळी जाहीर केला जाईल.

ICSI CS Foundation Exam 2021 : सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर, येथे जाणून घ्या तपशील
सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर, येथे जाणून घ्या तपशील
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 7:27 AM

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS फाउंडेशन परीक्षा 2021 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. डिसेंबर टर्मची परीक्षा 3 आणि 4 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट देऊन नोटीस तपासू शकतात. संस्थेने डिसेंबर 2021 सत्रापासून रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे फाउंडेशन प्रोग्राम (ICSI CS Foundation Exam 2021) साठी संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही दिवसांच्या परीक्षा चार शिफ्टमध्ये घेण्यात येतील – पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 11, दुसरी शिफ्ट दुपारी 12 ते 1.30, तिसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते दुपारी 4 आणि चौथी शिफ्ट संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत. पेपर 1 आणि पेपर 2 पहिल्या दिवशी आणि पेपर 3 आणि पेपर 4 दुसऱ्या दिवशी घेण्यात येतील. (ICSI CS Foundation Exam 2021, CS Foundation exam date announced, know details here)

ICSI CS Foundation Exam 2021 असे डाऊनलोड करा वेळापत्रक

स्टेप 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जा. स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या What’s New च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : आता टाईम टेबलवर क्लिक करा. स्टेप 4 : टाईम टेबल स्क्रीनवर येईल. स्टेप 5 : आता हे चेक करा आणि डाउनलोड करा.

जून परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS निकाल 2021 तारीख (ICSI CS June Result 2021 Date) जाहीर केली आहे. व्यावसायिक, कार्यकारी आणि फाउंडेशन प्रोग्रामचा निकाल 13 ऑक्टोबर 2021 रोजी एकाच वेळी जाहीर केला जाईल. तिन्ही अभ्यासक्रमांचा निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जाहीर केला जाईल. उमेदवार केवळ या वेबसाईटला भेट देऊन परीक्षेचा निकाल तपासू शकतात. संस्थेने जारी केलेल्या नोटीसनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. त्याचबरोबर कार्यकारी अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 2 वाजता आणि फाउंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 100 पदं वाढवली 

तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आमखी 100 जागा वाढवल्या आहेत. या जाहिरातीप्रमाणे एकूण  290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. मात्र, आता ही पदसंख्या वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने थेट 100 पदं वाढवली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक जारी केलंय. यामध्ये एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात करण्यात आली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ICSI CS Foundation Exam 2021, CS Foundation exam date announced, know details here)

इतर बातम्या

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान

Electricity Crisis : संपूर्ण लेबनॉन अंधारात बुडाले, अनेक दिवस देशात येणार नाही वीज, चीन-जर्मनीनंतर भारतालाही धोका

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.