ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास…
India Post Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. भारतीय पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. 2026 च्या इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीबाबत एक मोठे अपडेट आले आहे. पोस्ट ऑफिस 25,000 पेक्षा जास्त ग्रामीण डाक सेवकांची भरती करणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर लगेचच अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. भारतीय पोस्ट ऑफिसने या भारती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमदेवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. थेट पद्धतीने निवड होईल. दहावीमधील मार्कच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 4 फेब्रुवारी 2026 रोजी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
4 फेब्रुवारी 2026 भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला दहावी मार्क शीट लागणार आहे. दहावीत गणित आणि स्थानिक भाषा असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार पोस्ट ऑफिसच्या भरतीयेची वाट बघत होते, शेवटी भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी ही मोठी संधी हातातून जाण्याच्या आता भरती प्रकियेसाठी अर्ज करावीत. दहावीतील मार्कानुसार, उमेदवाराची निवड केली जाईल. शिवाय उमेदवाराला सायकल देखील चालवता आली पाहिजे.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवात- 20 जानेवारी 2026
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख- 4 फेब्रुवारी 2026
भरती प्रक्रियेसाठी फिस भरण्याची तारीख – 5 फेब्रुवारी 2026 रात्री 11 पर्यंत..
अर्ज सुधार – 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी
मेरिट लिस्ट जाहीर होण्याची तारीख – 20 फेब्रुवारी 2026
