Indian Army Recruitment 2021: लॉ पदवीधरांसाठी भारतीय सेनादलात संधी, अर्ज कुठे करायचा?

भारतीय सेनादलाच्या JAG Entry Scheme 28th Course मध्ये भारतीय अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Indian Army Recruitment 2021: लॉ पदवीधरांसाठी भारतीय सेनादलात संधी, अर्ज कुठे करायचा?
नोकरी


Indian Army Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय सेनादलाच्या JAG Entry Scheme 28th Course मध्ये भारतीय अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवार भारतीय सेना दलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज 28 ऑक्टोबरपर्यंत सादर करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जज अॅडव्होकेट जनरल ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 7 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 2 आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 पदं राखीव आहेत. निवड झालेल्या उमदेवारांची निवड14 वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यात 10 वर्षांचा कालावधी असेल, दुसऱ्या टप्प्यात 4 वर्षांचा कालावधी वाढवून दिला जाईल.

पात्रता

भारतीय सेनादलात JAG 28th Entry Scheme 2021 अंतर्गत पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी किमान 55 टक्केंसह एलएलबी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही एका राज्यात वकील म्हणून काम करण्यासाठी नोंदणीसाठी पात्र असला पाहिजे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.

उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि एसएसबी मुलाखत घेतली जाईल. पात्र आणि इच्छूक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

याशिवाय 58 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल पुरुष आणि 29 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल महिला कोर्ससाठी देखील नोटिफिकेशना जीर करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार Indian SSC Technical Recruitment 2021 साठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.

स्टेट बँक इंडियामध्ये 606 जागांवर बंपर भरती,

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 606 जागावंर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एसबीआयमध्ये स्पेशालिस्ट केडरमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह पदांसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी आणि एमबीए उत्तीर्ण उमेदवारांना ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रेजुएट, एमबीए उत्तीर्ण अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँकेच्या sbi.co.in वेबसाईटवर 18 ऑक्टोबर 2021 अर्ज दाखल करु शकतात.

वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह या पदासांठी पदनिहाय वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पदनिहाय वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. उमदेवार स्टेट बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन पाहू शकतात.

इतर बातम्या:

Maharashtra Health Dept Exam Date Update: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

Indian Army Recruitment 2021 apply online for jag entry scheme 28th course at joinindianarmy nic in

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI