राज्यसेवेच्या 390 जागांसाठी अडीच लाख अर्ज, MPSC कडून पूर्व परीक्षेच्या तारखेवर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चं आयोजन 2 जानेवारी 2022 रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे.

राज्यसेवेच्या 390 जागांसाठी अडीच लाख अर्ज, MPSC कडून पूर्व परीक्षेच्या तारखेवर शिक्कामोर्तब
MPSC EXAM
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 1:36 PM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चं आयोजन 2 जानेवारी 2022 रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर केली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 251589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयोगानं जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क जमा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना पुन्हा एक संधी दिली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा शल्क जमा केल्यानंतर आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ट्विट

जानेवारीमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मार्चमध्ये

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

पदांचा तपशील

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र  लोकसेवा आयोगानं सुरुवातीला 290 जागांसाठी अर्ज मागवले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा पदसंख्येमध्ये 100 पदांची वाढ करण्यात आली होती.

इतर बातम्या:

MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

MPSC Maharashtra Public Service Commission declare aspirants number for state service exam 2021

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.