रिझर्व्ह बँकेत डॉक्टर पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि अंतिम तारीख जाणून घ्या सविस्तर
आरबीआय म्हणजेच रिजर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मेडिकल कंसल्टंट भरतीसाठी जागा निघल्या आहेत, परंतू अर्ज कसा करायचा, भरती प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज कोण करु शकतं? चला संपुर्ण माहिती या लेखातून जाणून घेऊया...

तुम्ही डॉक्टर आहात आणि देशातील सर्वात मोठी बँक संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये काम करण्याचं तुमचं स्वप्न आहे? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. आरबीआयने मेडिकल कंसल्टंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती काॅन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जात आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी rbi.org.in वर जाऊन ऑफलाइन फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल.
कोण अर्ज करू शकते?
एकूण 13 पदांसाठी ही भरती चालवली जात आहे. ज्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा एमडी पदवी आहे, तेच उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत. तसेच, जर तुम्ही जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असेल आणि तुमच्याकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आरबीआयने सध्या या भरतीसाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.




किती पगार दिला जाईल?
या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति तास 1,000 रुपये पर्यंत पगार दिला जाईल. अर्थात, तुम्ही दिवसातून काही तास काम करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. विशेष म्हणजे काॅन्ट्रॅक्ट बेसिसवर जाॅब असूनही असा पगार मिळणे फायदेशीर बाब मानली जात आहे.
निवड कशी केली जाईल?
डाॅक्युमेंट व्हॅरिफिकेशन आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. म्हणजेच, या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. जर तुमचे डाॅक्युमेंट बरोबर असतील आणि तुम्ही मुलाखतीत चांगले काम केले, तर निवड होण्याची शक्यता आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यामध्ये, तुम्हाला ऑफलाइन फॉर्म भरावा लागेल. सर्वप्रथम, आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट, rbi.org.in वर जा. इथे, रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जा आणि मेडिकल कंसल्टंट भरतीचे नोटिफिकेशन उघडा. फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म भरल्यानंतर, पदवीची प्रत, फोटो, स्वाक्षरी इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा-
प्रादेशिक संचालक,
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट (रिक्रुटमेंट सेक्शन), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई रिजनल ऑफिस, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 40001