UPSC NDA/NA I 2022 Notification: सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर; युपीएससीकडून अधिसूचना जारी

अधिकृत अधिसूचनेमध्ये 400 रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे. यासंबंधी परीक्षा सुरू होण्याच्या जवळपास 3 आठवडे आधी उमेदवारांना एक ई-प्रवेशपत्रदेखील जारी केले जाणार आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.

UPSC NDA/NA I 2022 Notification: सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर; युपीएससीकडून अधिसूचना जारी
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 9:55 PM

नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल किंवा नौदलामध्ये रुजू होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. सैन्य दलांमध्ये 400 रिक्त पदांची भरती होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यासंदर्भात अधिसूचना जारी करून एनडीए परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 10 एप्रिल 2022 रोजी एनडीएची परीक्षा होणार आहे.

युपीएससीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी / नौदल अकादमी NDA / NDA I 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आता सर्व पात्र उमेदवारांसाठी (पुरुष आणि महिला दोन्ही) अर्ज जमा कार्यासंबंधी विंडो देखील उघडण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकचा वापर करू शकतात.

UPSC NDA/NA I 2022: रिक्त पदांचा तपशील

लष्कर (एनडीए) – 208 पदे (10 महिला) नौदल – 42 पदे (3 महिला) हवाई दल – 120 पदे NA – 30 (केवळ पुरुष)

UPSC NDA/NA I 2022 अधिसूचना: अर्ज कसा करावा

पायरी 1: अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या. पायरी 2: मुख्यपृष्ठावर प्रदर्शित झालेल्या NDA/NA सूचनेवर क्लिक करा. पायरी 3: आता नवीन पृष्ठावर आपला तपशील नोंदवून नोंदणी करा. पायरी 4: आता तुमच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा. पायरी 5: विनंती करण्यात आलेली आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. पायरी 6: शुल्क (फी) भरा आणि अर्ज सबमिट करा.

अधिकृत अधिसूचनेमध्ये 400 रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे. यासंबंधी परीक्षा सुरू होण्याच्या जवळपास 3 आठवडे आधी उमेदवारांना एक ई-प्रवेशपत्रदेखील जारी केले जाणार आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल. 900 गुणांसाठी गणित आणि सामान्य अभियोग्यता या विषयांची परीक्षा असेल. UPSC NDA I 2022 परीक्षेची तारीख 10 एप्रिल 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 आहे. जे उमेदवार संरक्षण दलामध्ये आपले करिअर करून देशसेवा करण्याच्या तयारीत आहेत, त्या उमेदवारांना ही परीक्षा देऊन संरक्षण दलामध्ये एंट्री मिळवता येणार आहे. (Recruitment of 400 posts in the defence force, date of NDA examination announced)

इतर बातम्या

MPSC Exam : एमपीएससीचा धडाका सुरुच, 900 पदांसाठी संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, राज्यसेवेचं हॉल तिकीट जाहीर

PM modi : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, मोदींनी विनायक राऊतांना विचारले…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.