SBI PO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रोबेशनरी ऑफिसर पदाचं नोटिफिकेशन जारी, 2056 पदांवर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत याद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे.

SBI PO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रोबेशनरी ऑफिसर पदाचं नोटिफिकेशन जारी, 2056 पदांवर भरती
एसबीआय
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Oct 05, 2021 | 10:37 AM

SBI PO Recruitment 2021 नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत याद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या वेबसाईटवरील करिअर टॅबमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदावारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

अर्ज कसा दाखल करायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर भेट द्या
स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवरील current openings लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : आता RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS ADVERTISEMENT NO: CRPD/PO/2021-22/18 च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4 : नवीन नोंदणीसाठी क्लिक करा.
स्टेप 5 : वैयक्तिक माहिती सादर करा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जाची प्रिंट घ्या.

पात्रता

भारतीय स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंत कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील नोटिफिकेशन वाचून उमेदवार अर्ज सादर करु शकतात.

वयोमर्यादा

प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे. भारतीय स्टेट बँकेच्या नियमांनुसार आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा अट शिथील केलेली असेल.

इतर बातम्या:

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

महापुरानंतर 2 महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कष्टकऱ्यांचं हजारोंचं नुकसान कसं दिसणार?

 

SBI PO Recruitment 2021 Vacancy for Probationary Officers in State Bank of India

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें