महापुरानंतर 2 महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कष्टकऱ्यांचं हजारोंचं नुकसान कसं दिसणार?

महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आज मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

महापुरानंतर 2 महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कष्टकऱ्यांचं हजारोंचं नुकसान कसं दिसणार?
केंद्रीय पथक आज पाहणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 10:05 AM

कोल्हापूर : महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आज मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आता दोन महिन्यानंतर केंद्रीय पथकाला महापुराने झालेलं नुकसान कसं दिसणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी पूर येऊन गेलाय. आता केंद्रीय पथक पुराच्या पाहणीसाठी आणि त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की, दोन महिन्यांपूर्वी झालेलं नुकसान केंद्रीय पथकाला आता कसं दिसणार आहे आणि आज पाहणीनंतर हे पथक सरकारला कोणता अहवाल दाखवणार आहे?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जातायत.

केंद्रीय पथक पाहणीसाठी येतंय. पण पाहणी केल्यानंतर इथे काहीच नुकसान झालं नाही, असा निष्कर्ष केंद्रीय पथक काढणार, मात्र वास्तविक पाहता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे पथकाने लक्षात घ्यायला हवं. महापुराच्या दोन महिन्यानंतर आपण पाहणी करताय म्हणजे पाहणीसाठी दिरंगाई झालीय.  आता कोणत्याही जाचक नियम अटींविना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

दोन महिन्यांनंतरही मदत नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय?

शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर द्या, उगीच त्यांची थट्टा कशाला करताय?, असा सवाल करत जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पथकाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत त्यावेळी झालेलं नुकसान आता पथकाला कसं दिसणार, किंबहुना त्यांना शेतकऱ्यांच्या भावना कशा कळणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

(Inspection tour of Central Squad To kolhapur For inspect the flood damage)

हे ही वाचा :

दोन महिन्यांनंतरही मदत नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय? राजू शेट्टी आक्रमक, शेताच्या बांधावरुन सरकारला इशारा

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.