AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Group : टाटाची ही कंपनी म्हणजे जणू सरकारी नोकरीच, कर्मचारी तर एकदम फिदा

Tata Group : टाटा कंपनीत काम म्हणजे सरकारी नोकरीसारखं सूख असल्याचा दावा अनेक कर्मचारी करतात. या कंपनीतील वर्क कल्चर तर चांगलंच आहे, पण कर्मचाऱ्यांना अन्य सुविधा पण भरपूर आहेत..

Tata Group : टाटाची ही कंपनी म्हणजे जणू सरकारी नोकरीच, कर्मचारी तर एकदम फिदा
| Updated on: Jun 11, 2023 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात नोकरी करणारे पगार वाढीसाठी अनेकदा कंपनी बदलतात. खास करुन करिअरच्या सुरुवातीला पगार वाढीसाठी पटापट कंपन्या बदलण्याचा ट्रेंड कमी झालेला नाही. पण प्रत्येक वेळी केवळ पगारचा महत्वाचा नसतो. काही ठिकाणी बॉसचा जाच, धरसोडीचे धोरण, कामासाठी अनुकूल वातावरण नसणे, टोमणे मारणारे सहकारी असे अनेक प्रकार कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी बाध्य करतात. पण भारतातील टाटा (Tata Group) ही खासगी कंपनी त्याला अपवाद आहे. या कंपनीतील प्रत्येक पाचवा कर्मचारी हा गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून याच कंपनीत काम करत आहे. आजी-माजी सर्वच कर्मचारी ही कंपनी बेस्ट वर्किंग प्लेस (Best Working Place) असल्याचा उगीच कौतूक करत नाहीत.

या कंपनीवर कर्मचारी फिदा टाटा समूह हा त्याच्या उच्च मूल्यांसाठी आणि देश सेवेसाठी ओळखल्या जातो. टाटाच्या अनेक कंपन्यांनी विविध क्षेत्रात नाव कमावले आहे. टाटाची टीसीएस (TCS) , टाटा कन्सल्टेन्सी सर्व्हिसेज ही जगभर पसरलेली कंपनी आहे. या कंपनीने परदेशातही झेंडे रोवले आहेत. या कंपनीकडे सध्या 6,14,795 कर्मचारी आहे. यातील प्रत्येक पाचवा कर्मचारी हा गेल्या 10 वर्षांहूनही अधिका काळापासून याच ठिकाणी नोकरी करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

TCS ची नोकरी का बेस्ट? टाटा समूहाची टीसीएस ही आयटी कंपनी आहे. कर्मचारी अनेक वर्षांपासून या कंपनीशी जोडलेले असल्याचा दावा टीसीएसचे एचआर मिलिंद लक्कड यांनी केला आहे. या कंपनीकडे सध्या 6,14,795 कर्मचारी आहे. त्यातील 1,25,000 कर्मचारी असे आहेत की, ज्यांना या कंपनीत 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. कंपनीचे 25 बिझनेस हेड ऑफिस आहेत. 2008 पासून हे कार्यालये सुरु आहेत.

कर्मचाऱ्यांना मोठी संधी या कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे गुणी, प्रामाणिक कर्मचाऱ्याला पदोन्नतीच्या संधी मिळतात. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवाती टीसीएसपासून केली होती. त्यांची इंटर्नशिप टीसीएसमध्ये सुरु झाली आणि आज ते टाटा सन्सचे चेअरमन आहेत. तर टीसीएसचे नवीन सीईओ कृतिवासन हे कंपनीसोबत 1989 पासून आहेत. कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांकडून चांगल्या ऑफर येतात, पण तरीही टीसीएसमध्ये करिअरची मोठी संधी असल्याने कर्मचारी इतर कंपन्यांमध्ये जात नसल्याचा दावा करण्यात येतो.

पहिली पसंती TCS टीसीएस कर्मचाऱ्यांनुसार, येथे तुमची पेस जपली जाते. कर्मचाऱ्याला पुढे जाण्यासाठी संधी देण्यात येते. येथे काम करण्याची वेगळीच क्रेझ आहे. येथील वर्ककल्चर एकदम जोरदार आहे. जॉब सिक्युरिटीसह अन्य अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना मिळतात. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो. त्यांना कामासाठीचे स्वातंत्र्य मिळते. ठरलेले काम ते दिवसभरात कधी पण पूर्ण करु शकतात. त्यांच्याकडे काम करण्यासाठी प्रचंड वेळ असतो. त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात येते. त्यामुळे येथील कर्मचारी इतर ठिकाणी जाण्याचा विचार करत नाही.

ही तर सरकारी नोकरी गेल्या दहा वर्षांपासून या कंपनीत काम करणाऱ्या तुषारच्या मते, येथे काम करणे सरकारी नोकरीत काम करण्यासारखेच आहे. सर्व सुविधा मिळतात. कुटुंबाला भरपूर वेळ देता येतो. कुठूनही काम करता येते. कार्यालयीन शिस्त पाळून चिंता मुक्त काम करता येते. पगार, नोकरीची हमी, मेडिक्लेम व इतर अन्य सुविधांसोबतच पदोन्नतीची संधी टीसीएसमध्ये मिळते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.