UPSC Civil Service Prelims Results 2021: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 10 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UPSC Civil Service Prelims Results 2021: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर,  10 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा
यूपीएससी
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 10:40 AM

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पीडीएफमध्ये उपलब्ध होईल. यूपीएससीतर्फे पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार मुख्य परिक्षेसाठी नव्यानं अर्ज दाखल करावे लागणार आहेत. मुख्य परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी तारखा आणि परीक्षा शुल्कांसंबधी माहिती यूपीएससीकडून पुन्हा जाहीर केली जाणार आहे.

निकाल कसा पाहायचा?

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल खालील सुचनांचं पालन करुन पाहू शकता.

स्टेप 1 : यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2: यानंतर What’s New या सेक्शनमध्ये निकाल उपलब्ध होईल. स्टेप 3 : या लिंकवर निकालाची पीडीएफ उपलब्ध होईल. स्टेप 4 : पीडीएफ फाईलमध्ये रोल नंबर नोंदवून निकाल पाहू शकता.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा पूर्व परीक्षा, भारतीय परकीय सेवा, भारतीय वनसेवा आणि भारतीय पोलीस सेवा यासाठी तीन टप्प्यात परीक्षांचं आयोजन केलं जातं. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाते.

पूर्व परीक्षेसाठी 10 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यंदाची यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा 712 पदांसाठी घेतली जात आहे.

इतर बातम्या

कुडाळ मालवणमधून 2024 ला विजयी होणारचं, निलेश राणेंनी रणशिंग फुंकलं

फक्त एक कॉल करा आणि आधार कार्डाच्या समस्या चुटकीसरशी सोडवा

Upsc civil service prelims results 2021 declared check now

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.