UPSC Recruitment 2022 : भरती, यूपीएससीकडून भरती जाहीर ! अधिसूचना लक्षपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा

UPSC Recruitment 2022 : भरती, यूपीएससीकडून भरती जाहीर ! अधिसूचना लक्षपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा
भरती, यूपीएससीकडून भरती जाहीर !

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यूपीएससी भरतीची पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया (Selection Process)आणि इतर तपशीलांबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना लक्षपूर्वक वाचावी.

रचना भोंडवे

|

May 14, 2022 | 8:26 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरतीची (UPSC Recruitment)अधिसूचना जारी केली असून, 50 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे (Official Website) upsc.gov.in 02 जून 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. शेवटची तारीख 03 जून 2022 आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यूपीएससी भरतीची पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया (Selection Process)आणि इतर तपशीलांबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना लक्षपूर्वक वाचावी.

हे सुद्धा वाचा

यूपीएससी भरती 2022 महत्त्वाच्या तारखा

 • ओआरए वेबसाइटद्वारे ऑनलाईन भरती अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2022
 • संपूर्णपणे सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या छपाईची शेवटची तारीख : 03 जून 2022 पर्यंत आहे.

पदाचे नाव व पदांनुसार रिक्त जागा

 • ड्रग इंस्पेक्टर (आयुर्वेद): 01 पद
 • असिस्टेंट डायरेक्टर : 09 पद
 • मास्टर इन हिंदी : 01 पद
 • असिस्टेंट डायरेक्टर (कॉस्ट): 22
 • असिस्टेंट रजिस्ट्रार जनरल (मॅप): 01 पद
 • सायंटिस्ट ‘बी’ (केमिस्ट्री) : 3 पद
 • ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (बॅलेस्टिक्स) : १ पद
 • ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (विस्फोटक) : 1 पद
 • ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (टॉक्सिकोलॉजी): 2 पद
 • ज्येष्ठ व्याख्याता (प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र) : 1 पद
 • असिस्टेंट प्रोफेसर (लॉ): 8 पद

शैक्षणिक पात्रता

 • असिस्टंट डायरेक्टर : चार्टर्ड अकाउटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा मास्टर्स ऑफ कॉमर्स.
 • औषध निरीक्षक (आयुर्वेद): मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आयुर्वेद विषयातील बॅचलर्स पदवी आणि इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल ॲक्ट, 1970 (1970 चा 48)
 • मास्टर इन हिंदी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अध्यापनातील पदवी.
 1. केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीची अधिसूचना

अर्ज फी

 • 25 रुपये
 • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/ महिला उमेदवार – शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

 • upsconline.nic.in येथील यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
 • होमपेजवर, विविध भरती पदांसाठी ऑनलाइन भरती अर्ज (ओआरए) वर क्लिक करा.
 • Apply Now पर्यायावर क्लिक करा.
 • अर्ज भरा .
 • आवश्यक असल्यास कागदपत्रे अपलोड करा.
 • अर्ज शुल्क भरा .
 • सेव्ह करा, ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें