AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSF MO Recruitment 2021 : बीएसएफमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, जाणून घ्या सर्व तपशील

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. (Vacancy for the post of Medical Officer in BSF, know the all details)

BSF MO Recruitment 2021 : बीएसएफमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, जाणून घ्या सर्व तपशील
प्रातिनिधिक फोटो
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 16, 2021 | 12:53 AM
Share

BSF MO Recruitment 2021 नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाकडून (BSF) जीडीएमओसह अनेक पदांवर भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 89 पदांवर (BSF MO Recruitment 2021) भरती केली जाईल. सीमा सुरक्षा दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 मे 2021 पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. डीजीएमओ आणि तज्ज्ञांच्या पदासाठी या भरती अंतर्गत (BSF MO Recruitment 2021) वैद्यकीय क्षेत्रात अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. (Vacancy for the post of Medical Officer in BSF, know the all details)

BSF MO Recruitment 2021 भरतीचा तपशील

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या रिक्त जागांमधील एकूण 89 पदांवर भरती होणार आहे. स्पेशालिस्टसाठी 27 आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या 62 पदांसाठी भरती होईल. रिक्त स्थानाविषयीची संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये दिली आहे.

पात्रता

स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. तसेच, स्पेशलिस्ट पदासाठी 1 वर्षाचा अनुभव असावा. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून एमबीबीएस पदवी घेतली पाहिजे.

पगाराचा तपशील

स्पेशालिस्ट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 85,000 रुपये आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 75,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन देण्यात येईल. पगाराची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. (Vacancy for the post of Medical Officer in BSF, know the all details)

इतर बातम्या

‘त्या’ रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाल्याचा चुकीचा समज, प्रमोद सावंत यांचा खुलासा

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेपासून Battlegrounds Mobile India साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!