Mumbai crime : मैत्री , धोका आणि.. कॉलेजबाहेर विद्यार्थ्याला 6 मित्रांची बेदम मारहाण, जीवच घेतला

शाळा - कॉलेज आणि तिथले मित्र... आपल्या आयुष्याचा ठेवा असतात. कॉलेजच्या आठवणी, तिथल्या मित्रांचे किस्से आयुष्यभर लक्षात राहतात. पण हेच मित्र आपले शत्रू बनले तर ? कधीकधी जीवावरही बेतू शकतं. मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली. तुर्भे येथे अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

Mumbai crime : मैत्री , धोका आणि.. कॉलेजबाहेर विद्यार्थ्याला 6 मित्रांची बेदम मारहाण, जीवच घेतला
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 2:10 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : शाळा – कॉलेज आणि तिथले मित्र… आपल्या आयुष्याचा ठेवा असतात. कॉलेजच्या आठवणी, तिथल्या मित्रांचे किस्से आयुष्यभर लक्षात राहतात. पण हेच मित्र आपले शत्रू बनले तर ? कधीकधी जीवावरही बेतू शकतं. मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली. तुर्भे येथे अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

या घटनेमुळे परिसरात खळबळीचे आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. मृत विद्यार्थ्याची त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 6 मुलांनी, त्याच्या मित्रांनी हत्या केली. त्याला कथितरित्या बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. याप्रकरण आरोपी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

कॉलेजबाहेर मारहाणीमुळे गेला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दुपारी १ वाजताच्या सुमारास कॉलेजच्या बाहेरच ही घटना घडली. यामध्ये मृत विद्यार्थ्याच्या दुसऱ्या मित्रालाही मारहाण करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपी विद्यार्थ्यांनी त्या मृत विद्यार्थ्याला लाथा -बुक्के मारले, ज्यामुळे तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, असे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितलं. आरोपींनी त्या विद्यार्थ्याच्या मित्रालाही मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला. मात्र या मारहाणीमागचे आणि हत्येमागचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. या घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय शोकाकुल आहेत. आपला तरणा-ताठा मुलगा आता या जगात नाहीये, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. तर या धक्कादायक घटनेमुळे कॉलेजमधील इतर विद्यार्थीही शॉकमध्ये आहेत.

मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्याआधआरे एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधानाचे कलम 302, कलम 326, कलम 143, कलम 147 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.