सख्खे भाऊ, पक्के वैरी… 2 भावांनी तरूणाला संपवलं, बाईकमधील पेट्रोल काढून मृतदेहही जाळला
बहिणीवर तरूणाचे प्रेम असल्याच्या संशयावरून भावांनीच एका तरूणाचा जीव घेतल्याची अतिशय धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात हा भयानक प्रकार घडला असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस पथकाने दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतलं.

हिणीवर तरूणाचे प्रेम असल्याच्या संशयावरून भावांनीच एका तरूणाचा जीव घेतल्याची अतिशय धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात हा भयानक प्रकार घडला असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस पथकाने दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतलं आहे. तरूणां बहिणीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून त्याच्या दोन भावांनीच त्याचा जीव घेतला. एवढंच नव्हे तर पुरााव नष्ट करण्यासाठी आपल्याच बाईकमधील पेट्रोल काढून टाकून त्याचा मृतदेह जाळला, आणि नंतर ते तिथून शांतपणे निघून गेले अशीही माहिती उघड झाली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दोन दिवसानंतर का होईना या प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात तीन दिवसापूर्वी एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका गायरान जमिनीत आढळून आला होता. त्यामुळे मोठी खळबळ माजली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणाचा तपासही सुरू केला. आकाश जाधव असे मृत तरूणाचे नाव आहे. अखेर तीन दिवसांनी या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालं.
तिसऱ्या दिवशी या हत्येची फकल झाली. दोन सख्ख्या भावांनीच आकाश याचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. याप्रकरणी बालाजी मिसाळ आणि गणेश मिसाळ या 2 सख्ख्या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आकाश याचं बहिणी सोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय त्या दोघांना होता, मात्र त्यांना हे पसंत नव्हतं. त्याच संशयावरून या 2 सख्ख्या भावांनी आकाशला रात्री बोलावून घेतले आणि गळा आवळून त्याचा खून केला. त्यांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्या दोघांनी आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढलं आणि आकाशचा मृतदेह जाळून टाकला आणि तेथून ते निघून गेले अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली.पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे अधिकच जलद गतीने फिरवली आणि तिसऱ्या दिवशी खुनाचा उलगडा करत ताब्यात घेतलं.