एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय मुलाचा तरुणीवर चाकूहल्ला, 3 तासात आरोपीला बेड्या

चंद्रपुरात 25 वर्षीय मुलाने एका युवतीवर चाकूहल्ला केला आहे. रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय मुलाचा तरुणीवर चाकूहल्ला, 3 तासात आरोपीला बेड्या
क्राईम

चंद्रपूर : चंद्रपुरात 25 वर्षीय मुलाने एका युवतीवर चाकूहल्ला केला आहे. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. दरम्यान केवळ 3 तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तरुणीवर उपचार सुरु

तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला लगोलग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथले डॉक्टर्स  उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

पोलिसांनी 3 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या

चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या मार्गावरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेनंतर पळताना आरोपी कैद झाला. हल्ल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 3 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ

या प्रकरणातील युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वतः पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शहर पोलिस ठाण्यात पोचून घटनेचा आढावा घेतला. ऐन सणांच्या काळात गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्ल्याचा हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात ससून रुग्णालयात धक्कादायक घटना, नर्सच्या वेषात आली 3 महिन्याच्या बाळाला घेऊन गेली

पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार होते घेत होते.

नर्सच्या वेषात येऊन बाळाळा पळवलं

सव्वीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीने तीन महिन्याच्या मुलीला पळविल्याने रुग्णालयात एखच खळबळ निर्माण झाली आहे. सविस्तर माहिती अशी की, नर्सचा ड्रेस घालून 26 वर्षीय महिला ससून रुग्णालयात शिरली. संधी साधत तिने वॉर्डात प्रवेश मिळवला. अन् बाळाच्या आईचं दुर्लक्ष होताच तिने डाव साधला. काही मिनिटांत तिने बाळाला घेऊन तिथून पोबारा केला.

आपलं बाळ आपल्या शेजारी होतं आणि आता नाहीय या कल्पनेने बाळाच्या आईने हंबरडा फोडला.  आईच्या हंबरड्याने वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील गलबलून आलं. यावेळी रुग्णालयात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्याचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळविल्याने ससूनची सुरक्षा यंत्रणा एवढी गहाळ कशी असू शकते, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

(25 year boy Attcked 20 year old Girl With Knifeout Of one Sided Love in Maharashtra Chandrapur)

हे ही वाचा :

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या, राहत्या घरात मृतदेह सापडला

तीन वेळा लग्न केलं, तीनही वेळा संसार मोडून माहेरी परतली, पित्याने घरात घेण्यास विरोध करताच जन्मदात्याची हत्या, बुलडाणा हादरलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI