AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकरच… अंगावर राख पडली म्हणून तरुणावर कुत्रा सोडला; पुण्यात चाललंय तरी काय?

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर प्रकार घडला आहे. येथे राख अंगावर पडल्याने संतापलेल्या तरुणाने आपला पिटबुल जातीचा कुत्रा एका तरुणावर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भयंकरच... अंगावर राख पडली म्हणून तरुणावर कुत्रा सोडला; पुण्यात चाललंय तरी काय?
pit bull dog Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 05, 2024 | 6:56 PM
Share

पुणे | 5 जानेवारी 2024 : पुणे शहरातील पर्वती भागात एक भयंकर प्रकार घडला आहे. येथील पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंगावर राख पडल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचा बदला घेण्यासाठी आपला पिटबुल जातीचा कुत्रा त्याच्या अंगावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पिटबुल जातीच्या भयंकर कुत्र्याच्या चाव्याने या आधी अनेक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाने या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

पर्वती येथील लक्ष्मीनगर शाहु कॉलनीतील रहिवासी आदित्य नितीन आंदेकर आणि त्याचे मित्र गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एका भिंती शेजारी शेकोटी पेटवून अंग शेकत बसले होते. या भिंतीवर ठेवलेली राखेची टोपली आदित्य याच्या अंगावर पडल्याने त्याला राग आला. त्यामुळे आदित्य याने तन्वीर याला शिवीगाळ केली. त्याने मुद्दामहून राखेची टोपली पाडल्याचा आदित्यने आरोप केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन शब्दाला शब्द वाढत जाऊन हाणामारी झाली. त्यावेळी आदित्य याने त्याचा पिटबुल जातीच्या कुत्रीला आदेश देत…’सारा बाईट हिम’ असा आदेश दिला. त्यानंतर पिटबुल जातीच्या कुत्रीने तन्वीरवर हल्ला केला. त्याच्या पाटीला आणि हाताला चावून तिने त्याला जखमी केले.

पिटबुलच्या हल्ल्याच्या अनेक घटना

या घटनेत जखमी झालेले तन्वीर रमजान सईद यांनी या प्रकरणात पर्वती पोलिस ठाण्यात आदित्य आंदेकर याच्या विरुद्ध भादंवि कलम 289, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहे. या पर्वती परिसरात या प्रकारचा हल्ल्याची घटना 21 जानेवारी रोजी देखील घडली होती. पिटबुल हा आक्रमक जातीचा कुत्रा असून त्याच्याद्वारे मनुष्यावर हल्ला करण्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....