AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Baby Found : सांगलीतील अपह्रत बाळ सापडले, रुग्णालयातील नर्सनेच केले कृत्य

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बाळासह आरोपी महिलेला शेणोली स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. बाळ सुखरुप आहे. एलसीबी, विटा व तासगावच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई करत अवघ्या 8-9 तासात बाळाचा शोध घेत आरोपीला अटक केले.

Sangli Baby Found : सांगलीतील अपह्रत बाळ सापडले, रुग्णालयातील नर्सनेच केले कृत्य
सांगलीतील अपह्रत बाळ सापडलेImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 25, 2022 | 1:57 AM
Share

सांगली : तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून रविवारी सकाळी अपहरण (Kidnapped) झालेले एक दिवसाचे बाळ (Baby) अखेर सापडले आहे. हॉस्पिटलमधील एका नर्सनेच हे बाळ पळवले होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी ही नर्स हॉस्पिटलमध्ये रुजू झाली होती. अपहरणाची सर्व हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बाळासह आरोपी महिलेला शेणोली स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. बाळ सुखरुप आहे. एलसीबी, विटा व तासगावच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई करत अवघ्या 8-9 तासात बाळाचा शोध घेत आरोपीला अटक केले. आरोपी महिलेने हे कृत्य का केले याची पोलीस चौकशी करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच नर्स म्हणून रुजू झाली होती आरोपी महिला

तासगाव येथे सिद्धेश्वर मंदिर चौकात डॉ. अंजली पाटील यांचे रुग्णालय असून, सदर रुग्णालयात दोनच दिवसापूर्वी आरोपी महिला नर्स म्हणून रुजू झाली होती. रुजू होताना महिलेने आपली सर्व कागदपत्रे एक-दोन दिवसात सादर करते असे डॉक्टरांना सांगितले होते. तसेच आपण जुळेवाडी येथील रहिवासी असून सध्या तासगावात राहत असल्याची खोटी माहितीही दिली. डॉक्टरांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला कामावर घेतले. याच दवाखान्यात चिंचणी येथील एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. शनिवारी या महिलेची प्रसुती झाली होती. रविवारी सकाळी आरोपी नर्स डिलिव्हरी वॉर्डमध्ये गेली आणि या बाळाला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आली. त्यानंतर बाळाला काखेतील पर्समध्ये टाकून पसार झाली. या घटनेने तासगावसह जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध

याप्रकरणी तासगाव पोलिसात माहिती देण्यात आली. त्यानुसार तासगावचे डीबी पथक तात्काळ दवाखान्यात हजर झाले. रुग्णालयातील स्टाफची चौकशी करत पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी खबऱ्यांना अॅक्टिव्ह केले. दर महिला शेणोली स्टेशनवर असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार विटा येथील वाहतूक पोलिसांनाही अलर्ट करण्यात आले. पोलीस पथकाने तात्काळ शेणोली स्थानकावर धाव घेत बाळासह महिलेला ताब्यात घेतले. बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून महिलेला तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. (A day old baby kidnapped from a hospital in Sangli has been found)

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर