Pak Murder : पाकिस्तानात क्रूरतेचा कळस, पत्नीची हत्या करून मृतदेह कढईत उकळला

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jul 14, 2022 | 11:40 PM

हा मृतदेह एका खासगी शाळेच्या स्वयंपाकघरात पडून होता. आरोपी तीन मुलांना घेऊन तेथून फरार झाला आहे. तर तीन मुलांना तेथेच सोडून दिले. आशिक असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Pak Murder : पाकिस्तानात क्रूरतेचा कळस, पत्नीची हत्या करून मृतदेह कढईत उकळला
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्या
Image Credit source: tv9

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीतील घरगुती वादा (Domestic Dispute)तून एका व्यक्तीने पत्नीची हत्या (Murder) करुन मृतदेह कढईत उकळल्याची अंगावर काटा आणणारी घटना कराचीत घडली आहे. आधी महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली, मग 6 मुलांसमोर तिचा मृतदेह (Deadbody) एका कढईत उकळला. यादरम्यान महिलेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. बुधवारी सिंध पोलिसांना नर्गिस नावाच्या महिलेचा मृतदेह एका मोठ्या पातेल्यात सापडला. हा मृतदेह एका खासगी शाळेच्या स्वयंपाकघरात पडून होता. आरोपी तीन मुलांना घेऊन तेथून फरार झाला आहे. तर तीन मुलांना तेथेच सोडून दिले. आशिक असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हत्येनंतर मृतदेह शाळेच्या स्वयंपाक घरात टाकून आरोपी फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आशिक बजौर हा एजन्सीमध्ये रहिवासी असून शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता. या शाळेतच नोकर क्वार्टरमध्ये राहत होता. गेल्या नऊ महिन्यांपासून ही शाळा बंद होती. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या 15 वर्षांच्या मुलीने या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत नराधम आपल्या तीन मुलांसह पळून गेला होता. एसएसपी अब्दुर रहीम शेराजी यांनी सांगितले की, पोलिसांनी बाकी तीन मुलांना सुरक्षित ठेवले आहे. ही घटना पाहून मुले खूपच घाबरली आहेत. दरम्यान आरोपीने असे का केले याचे निश्चित कारण अद्याप कळू शकले नाही.

मात्र, पती पत्नीला अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडत होता, मात्र पत्नीने यास नकार दिला. याच रागातून पतीने तिची हत्या करुन मृतदेह कढईत उकळला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आरोपीच्या अटकेनंतरच खरे कारण उघड होईल. आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. (A husband killed his wife and boiled her body pan in Pakistan)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI