AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dowry Death : मुलीची तब्येत माहेरचे मुलीला पहायला गेले, घरी पोहचताच पायाखालची जमिनच सरकली !

नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेच्या पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dowry Death : मुलीची तब्येत माहेरचे मुलीला पहायला गेले, घरी पोहचताच पायाखालची जमिनच सरकली !
जुन्या वादातून दोन गटात राडाImage Credit source: Google
| Updated on: Jan 14, 2023 | 3:48 PM
Share

गाझीपूर : कायदे अधिक कठोर होऊनही हुंड्यासाठी छळ करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. नवविवाहित महिलेने माहेरातून हुंडा म्हणून काहीच दिले नाही, या रागातून सासरच्या लोकांनी तिचा अमानुष छळ केला. याचदरम्यान तिला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गाझीपूर येथील सेवराई परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. नवविवाहित महिलेच्या पतीसह सासू-सासर्‍यांनी अमानुषपणे छळ केला आणि नंतर बेदम मारून करून तिची हत्या केली. याप्रकरणी नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेच्या पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सेवराई येथील पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

महिलेचे वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

गहमर पोलीस ठाण्यांतर्गत देवल गावामध्ये नवविवाहितेच्या हत्येने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मृत महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. अवघ्या वर्षभरात मुलीला सासरच्या छळाला कंटाळून प्राण गमवावा लागला. त्यामुळे माहेरचे लोक प्रचंड हादरले.

मृत नवविवाहित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंड्यासाठी छळवणूक, फसवणूक आणि हत्या अशा प्रकारे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याच दरम्यान पोलीस पीडित महिलेच्या घराच्या आवारात इतर पुराव्यांचा शोध घेत आहेत. तसेच शेजारच्या लोकांचे जबाब नोंदवून पुढील तपास केला जात आहे.

मुलीचे वडिल राम धान प्रजापती यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार देऊन 24 वर्षीय मुलगी ज्योती कुमारी हिचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी मारझोड करून खून केल्याचा आरोप केला आहे. मुलीला मृतावस्थेत पाहून ते खालीच कोसळले होते.

ज्योती हिचे वर्षांपूर्वीच देवल गावातील सुरज प्रजापती याच्याशी लग्न झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ज्योतीची तब्येत बरी नसल्याचे तिच्या माहेरच्या लोकांना सांगण्यात आले होते. त्या माहितीवरून माहेरचे लोक ज्योतीला पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलीला मृतावस्थेत पाहून ज्योतीच्या माहेरच्या लोकांच्या पायाखालील जमीनच सरकली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.